Goa Shigmotsav 2025 Dainik Gomantak
गोवा

Mandrem Shigmotsav: मांद्रेत शिगमोत्सवानिमित्त्य वेगळी प्रथा! बक्षीस वितरणासाठी सेलिब्रिटींऐवजी ज्येष्ठांचा सन्मान

Goa Shigmotsav 2025: गोवा पर्यटन खाते व मांद्रे येथील उदरगत संस्थेच्या संयुक्त विद्यमाने शिमगोत्सव उत्सव २७ ते २९ मार्च पर्यंत मांद्रे पंचायत परिसरात होणार आहे.

Sameer Panditrao

Shigmotsav Mandrem Goa Tourism

हरमल: गोवा पर्यटन खाते व मांद्रे येथील उदरगत संस्थेच्या संयुक्त विद्यमाने शिमगोत्सव उत्सव २७ ते २९ मार्च पर्यंत मांद्रे पंचायत परिसरात होणार आहे. यंदा शिगमोत्सव तीन दिवस उत्सव असून, संध्या ५ ते रात्री १२ पर्यंत कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

यंदा विख्यात गायक मंजुषा पाटील व विश्वजित बोरवणकर यांच्या गायनाचा कार्यक्रम गुरुवार २७ रोजी संध्या ७ वा पंचायत मैदानावर आयोजन केल्याचे समजते. यात चित्ररथ, रोमटामेळ,वेशभूषा आदी स्पर्धांचे आयोजन केले आहे.

दीपोत्सव स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस वितरण होईल. यंदाचा बक्षीस वितरण वेगळ्या पद्धतीने साजरा होणार असून, मोठे सेलिब्रिटी नसून मतदारसंघातील जेष्ठ व वयस्कर व्यक्तींच्या हस्ते होणार आहे.

यावेळी शिगमोत्सव आयोजनासाठी विविध स्पर्धा व विविध समित्यांची निवड करण्यात आली. यावेळी मांद्रे सरपंच राजेश मांद्रेकर, पंच रॉबर्ट फर्नांडिस, माजी सरपंच सुभाष असोलकर, मोरजीचे प्रसन्नकुमार शेटगावकर, हरमल सरपंच अनुपमा मयेकर, पंच भिकाजी नाईक, पार्सेचे पंच अजित मोरजकर, पालयेचे पंच सागर तीळवे, निवृत शिक्षक दयानंद मांद्रेकर उपस्थित होते. स्वागत व निवेदन सूरज नाईक यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT