Manish Jadhav
गोव्यात शिगमोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. गोव्यात दरवर्षी मोठ्या उत्साहात शिगमोत्सव साजरा केला जातो. या फोटोमध्ये तुम्ही एक बालगोपाल पाहू शकता, ज्याने श्री प्रभुरामचंद्राची वेशभूषा केली आहे.
शिगमोत्सव हा गोव्याच्या संस्कृतीचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. शिगमोत्सवात गोमंतकीय पुरुषांबरोबर महिला देखील हिरीरीने भाग घेतात. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, महिला पारंपारिक नृत्य करताना दिसत आहेत.
गोव्यातील शिगमोत्सवाच्या दिंडीत बालगोपालही आपला सहभाग नोंदवतात. शिगमोत्सवादरम्यान बालगोपालांची बाल दिंडी पाहायला मिळते. या फोटोमध्ये तुम्ही एक बालिका डोक्यावर तुळशी वृंदावन घेवून विठुरायाची भक्तीन झालेली पाहायला मिळते.
शिगमोत्सवात गोमंतकीय वेगवेगळ्या उत्सवाप्रमाणे चित्ररथही बनवतात. या फोटोमध्ये तुम्हाला महाकाली देवी सिंहावर अरुढ झालेली पाहायला मिळत आहे.
गोव्यातील मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या शिगमोत्सवात राजकीय पुढारी देखील आपली उपस्थिती नोंदवतात. पणजीत साजरा झालेल्या शिगमोत्सवात राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याबरोर प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आणि पर्यटनमंत्री रोहन खवंटे देखील सहभागी झाले.
शिगमोत्सवात सहभागीर झाल्यानंतर उपस्थितांबरोबर सेल्फी काढली.
पर्यटनमंत्र्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याबरोबर सेल्फी काढली. यावेळी त्यांनी पारंपारिक वेशभूषा केली.
शिगमोत्सवाची बहार बालगोपालांच्या चेहऱ्यावर वेगळीच रंगत आणते. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक बालगोपाळ छत्रपती शिवाजी महाराजांचा बाल मावळा बनला आहे.