Goa Shigmotsav  Dainik Gomantak
गोवा

वास्कोत ‘घुमचे कटर घूम’नाद घुमला

पारंपारिक तसेच देव-देवतांवर आधारित चित्ररथ पहावयास मिळाले.

दैनिक गोमन्तक

वास्को: वास्को शहरात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत आज शिगमोत्सव मिरवणूक झाली. कोविड महामारीच्या दोन वर्षांच्या खंडानंतर शहरात ‘घुमचे कटर घूम’नाद घुमला. वास्को येथे मुरगाव नागरिक शिगमोत्सव समिती व गोवा पर्यटन विभाग पुरस्कृत चित्ररथ, लोक नृत्य, वेशभूषा स्पर्धा उत्साहात पार पडली. तसेच विविध पारंपारिक तसेच देव-देवतांवर आधारित चित्ररथ पहावयास मिळाले.

यात घोडेमोडणी, तालगडी, गोफ, लेझीम आधी रोमटामेळ घेऊन विविध गावातील लोक आले होते. यावेळी शेकडो नागरिक तालाच्या हिंदोळ्यावर आजच्या रोमटामेळ चित्ररथ मिरवणुकीचा आनंद घेत होते.

प्रथा परंपरेनुसार वास्को शहरात आज शासकीय शिगमोत्सव मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी मिरवणूक मार्गावर सजावट करण्यात आली होती. मुरगाव शिगमोत्सव समितीतर्फे श्री दामोदर चरणी श्रीफळ ठेवून मिरवणुकीला सुरुवात केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"50 हजार तालांव, 48 तास कोलवाळ जेल", दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या पर्यटकांवर लोबोंनी काढलाय 'जालीम' उपाय!

India Pakistan Conflict: "पाकिस्तान पहलगामसारखा आणखी एक हल्ला करू शकतो", लेफ्टनंट जनरल मनोज कटियार यांचा इशारा; भारत प्रत्युत्तर देण्यास सज्ज

Viral Post: एका रात्रीसाठी 60 हजार, ओला - उबेर नाही; पर्यटकांची गोव्याकडे पाठ व्हिएतनाम, थायलंडला पसंती? पोस्ट चर्चेत

Viral Video: 'हा तर खरा देशी जुगाड'! हवा खाण्याची ही 'गंमतशीर ट्रिक' पाहून नेटकऱ्यांनी डोक्याला लावला हात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Arjun Tendulkar: IPL नंतर आता 'रणजी'मध्ये धमक दाखवणार सचिनचा लेक अर्जुन, 15 ऑक्टोबरपासून 'या' संघासाठी खेळताना दिसणार

SCROLL FOR NEXT