Valpoi Shigmotsav 2023
Valpoi Shigmotsav 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Shigmotsav 2023 : लोककला, परंपरा जपण्यासाठी शिगमोत्सव हवाच!

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Shigmotsav 2023 : सत्तरी ही कलाकारांची खाण आहे, आणि आपली लोकसंस्कृती अबाधित राखण्याचे काम लोककलेतून होत असते. आपली संस्कृती, परंपरा पुढे नेण्यासाठी शिगमोत्सवासारखे उत्सव वेळोवेळी साजरे केले पाहिजे, यातून आपण एकसंध होऊन उत्सव साजरा करतो, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी केले.

पर्यटन खात्याच्या सौजन्याने सत्तरी शिगमोत्सव समितीतर्फे वाळपई सत्तरी येथे आयोजित ‘लोकोत्सव २०२३’ शिगमोत्‍सवाच्या उद्‍घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

वाळपई हातवाडा नाणूस येथे पारंपरिक पद्धतीने नारळ वाढवून लोकोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. मोसोर्डे येथील गावकरी सूर्याकांत गावस यांनी सांगणे केल्यानंतर खऱ्या अर्थाने उत्सवाला सुरूवात झाली.

व्यासपीठावर समितीच्या कार्याध्यक्ष तथा पर्येच्या आमदार डाॅ. दिव्या राणे, तर स्वागताध्यक्ष वाळपई नगराध्यक्ष शैहजीन शेख, उपाध्यक्ष माजी आमदार नरहरी हळदणकर, विनोद शिंदे, होंडा जिल्हा पंचायत सदस्य सगुण वाडकर, नगरगाव जि. पं. सदस्य राजश्री काळे, केरी जि. पं. सदस्य देवयानी गावस आदींची उपस्थिती होती.

शिगमोत्सवात सहभागी आकर्षक चित्ररथ

  • लहान मुलांपासून ते वयस्करांपर्यंत सर्वचजण लोकोत्सवात सहभागी झाले होते. वाळपई पालिका व्यासपीठावर लोकनृत्य सादरीकरण करण्यात येत होते.

  • तर वाळपई बाजारात रोमटामेळ पथकाचे नाचत गात त्यांचे आगमन होत होते. मिरवणूक पाहण्यासाठी वाळपईत प्रचंड गर्दी जमली होती. शहर पताका व रोषणाईने सजविण्यात आले होते.

  • लहान मुलांची वेशभूषा, त्यात मोठ्याच्या वेशभूषेत तुकाराम, भोलेनाथ, विष्णू, साईबाबा, कांतारा आदींच्या वेशभूषेत आलेले स्पर्धक उपस्थित होते. आकर्षक चित्ररथांनी उपस्थित गर्दीची मने जिंकली.

राणे दाम्पत्याने लुटला ढोल वाजवून आनंद

यावेळी हजारोंच्या उपस्थितीत हा लोकोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. वाळपई नगरी प्रकाशमय झाली होती. त्यात विविध चित्ररथ, वेशभूषा, लोकनृत्य रोमटामेळ स्पर्धा, तसेच शिवगर्जना पुणे हे महिलांचे खास ढोल पथक सर्वांसाठी आकर्षण ठरले.

त्यात आमदार डाॅ. दिव्या राणे यांनीही ढोल वाजवून आनंद अनुभवला. त्यांनी आवेशपूर्ण ढोल वाजवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनीही ढोल वादनाचा आनंद लुटला.

"शिगमोत्सवातून नवनव्या कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळते. शिगमोत्सवात एकाच ठिकाणी, लोकनृत्य, फुगडी, रणमाले, रोमटामेळ आदी आपल्या विविध संस्कृतीचे प्रतीक दिसते. त्यामुळे अशा उत्सवातून गाव एकत्र येतो."

"आज वाळपईत एवढी मोठी गर्दी पाहुन आपण भारावून गेलो आहे. सत्तरीची जनता एकत्र असून प्रत्येक उत्सवाला एकमेकांना प्रत्येकजण सहकार्य करत आहेत. हे गावच्या विकासासाठी महत्वाचे आहे. त्यामुळे सत्तरीचा विकास करताना आपली धार्मिक, व लोकसंस्कृती टिकून रहावी, यासाठी आपण प्रयत्न करत रहाणार आहे."

- विश्‍वजीत राणे, आरोग्यमंत्री

"आज प्रत्येक उत्सवात पुरुषांबरोबर महिलांचा सहभाग मोठा असतो. आपली संस्कृती टिकवून ठेवण्याचे काम आजची पिढी करत आहे, हे कौतुकास्पद आहे. सत्तरीची जनता वेळोवेळी एकमेकांच्या आनंदात सहभाग होत असते,हे या निमित्ताने पुन्हा सिद्ध झाले."

- डाॅ. दिव्या राणे, आमदार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

‘’दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी सेलिब्रिटी अन् सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तितकेच जबाबदार’’, पतंजली प्रकरणात SC ची कठोर टिप्पणी

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

अमेरिकेनं बनवलं AI द्वारा कंट्रोल होणारं पहिलं फायटर जेट F16; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

SCROLL FOR NEXT