She set herself on fire  Dainik Gomantak
गोवा

महिलेने वास्को पोलिस स्थानकाबाहेर स्वत:ला पेटवून घेतले आणि....

पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल केले.

दैनिक गोमन्तक

वास्को: वास्को पोलिस ठाण्याच्या बाहेर एका महिलेने गुरुवारी रात्री उशिरा स्वतःला पेटवून घेतल्याची घटना घडली.पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, शुक्रवारी त्या महिलेचे बांबोळी (Bambolim) येथे गोवा वैद्यकीय इस्पितळात निधन झाले. (She set herself on fire outside Vasco police station)

हिमाचल प्रदेशहून वास्कोत (Vasco) आलेल्या 41 वर्षीय मंजू सिंग नावाच्या महिलेने गुरुवारी मध्यरात्री स्वतःला जाळून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी रात्री 12 च्या दरम्यान घडली. पोलिस स्थानकाबाहेर उभे राहून स्वत:ला पेटवून घेतले व नंतर पोलिस स्थानकात पळत गेली. अचानक घडलेल्या या प्रकाराने पोलिसही हादरले होते. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, मंजू ही गुरुवारी वास्कोत आली. वास्कोतील एका हॉटेलमध्ये तिने खोली घेतली. हॉटेलपासून 250 मीटरवरच वास्को पोलिस स्थानक आहे. रात्री अकराच्या दरम्यान मंजू वास्को पोलिस स्थानकात आली आणि आपला नवरा गायब असल्याचे सांगितले.

इतक्यात तिला तिच्या नवऱ्याचा फोन आल्याचे सांगितल्यानंतर तिला पोलिस स्थानकातून (Police Station) जाऊ देण्यात आले. त्यानंतर पंधरा मिनिटांत तीच महिला जाळून घेतल्याच्या स्थितीत पोलिस स्थानकाच्या आत पळत येत असल्याचे पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिसून येताच त्यांनी धाव घेऊन आग विझवली व तिला रुग्णालयात दाखल केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ZP Election: पंचायत मंत्री माविन गुदिन्होंनी बजावला मतदानाचा हक्क! म्हणाले, 'हा लोकशाहीचा उत्सव'

India T20 World Cup Squad: सूर्यकुमारसाठी हा 'वर्ल्डकप' शेवटचा? हरपलेल्या फॉर्ममुळे वाढले टेन्शन; गिलबाबतही प्रश्नचिन्ह

स्वातंत्र्यसैनिकांनी जो गोवा दिला, तो पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आमची जबाबदारी! CM सावंतांचे प्रतिपादन

Goa Live News: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

Goa Politics: 'भाजप-मगोप युती विरोधकांना क्लिन स्वीप करेल, राज्यात यापुढे तिहेरी इंजिन कार्यरत होईल'! CM सावंतांनी व्यक्त केला विश्वास

SCROLL FOR NEXT