Shankhnad Mahotsav Goa Dainik Gomantak
गोवा

Shankhnad Mahotsav: न भूतो, न भविष्‍यति! शंखनाद महोत्सवासाठी जोरदार तयारी; लाखो भाविक लावणार उपस्‍थिती

Shankhnad Mahotsav Goa: फर्मागुढीतील अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळील विस्तीर्ण मैदानावर हा शंखनाद महोत्सव होईल. येत्या शुक्रवारी १६ रोजी संध्याकाळी ३ वाजता भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.

Sameer Panditrao

फोंडा: फर्मागुढी-फोंडा येथे १७ ते १९ मे असे तीन दिवस शंखनाद महोत्सव होणार आहे. त्‍याची तयारी सध्या जोरात सुरू आहे. ‘न भूतो, न भविष्‍यति’ व राज्यात आतापर्यंत झाला नाही एवढे भव्य आणि दिव्य असे या महोत्सवाचे स्वरूप असेल. लाखो भाविक महोत्‍सवाला उपस्‍थिती लावतील, अशी माहिती आयोजकांतर्फे देण्यात आली.

फर्मागुढीतील अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळील विस्तीर्ण मैदानावर हा शंखनाद महोत्सव होईल. येत्या शुक्रवारी १६ रोजी संध्याकाळी ३ वाजता भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक रामनाथी येथील सनातन आश्रमाकडून सुरू होणार असून फोंडामार्गे फर्मागुढीला येईल. त्यानंतर उभारण्यात आलेल्या भव्य मंडपाचे उद्‌घाटन वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते होणार आहे.

या शंखनाद महोत्सवाला उपस्थित राहण्यासाठी भव्य अशा मंडपांची उभारणी करण्यात आली आहे. त्यात मुख्य मंडपात अकरा हजार तर बाजूच्या दोन मंडपात प्रत्येकी सात हजार लोकांची बसण्याची क्षमता असेल.

भोजनाची व्यवस्था अन्य मंडपात करण्यात आली आहे. सहभागींना आपले आधारकार्ड सोबत आणावे लागेल, अशी माहिती आयोजकांतर्फे अभय वर्तक, जयंत मिरिंगकर, जयेश थळी, सत्यविजय नाईक व सुचेंद्र अग्नी यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT