
फोंडा: फर्मागुढी- फोंड्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळील मैदानावर १७ मेपासून शंखनाद महोत्सवाचे आयोजन सनातन संस्थेकडून करण्यात येणार आहे. या महोत्सवाला किमान पंचवीस हजारजणांची उपस्थिती असेल. त्यात २२ देशांतील १३०० साधक उपस्थिती लावतील, असा विश्वास फोंड्यातील पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आला.
यावेळी सनातन संस्थेशी संबंधित अरुण देसाई, जयंत मिरिंगकर, नारायण नावती, अभय वर्तक, प्रणव साधले, अनील नाईक व सत्यविजय नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
१७ रोजी सकाळी दहा वाजता या महोत्सवाचे उद्घाटन होणार असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची उपस्थिती असेल. देशविदेशातून संत महंत तसेच हिंदूप्रेमी नागरिकांची मोठी उपस्थिती या तीन दिवसीय शंखनाद महोत्सवाला लाभणार आहे.
महोत्सवात हिंदू राष्ट्ररत्न आणि सनातन धर्मश्री पुरस्काराचे वितरण होणार असून ऐतिहासिक आणि दुर्मिळ शिवकालीन शस्त्रांचे भव्य प्रदर्शनही होणार आहे. विशेष म्हणजे, पंधरा संतांच्या पादुका तसेच सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शनही उपस्थितांना होणार आहे.
विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार येसाजी कंक यांची तलवार, कान्होजी जेधे यांचे चिलखत तसेच छत्रपती संभाजी महाराजांना ज्या साखळदंडाने बांधून ठेवले होते, ते साखळदंड प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.