Goa Shack Dainik Gomantak
गोवा

Goa Shack: शॅक व्यावसायिकांना सवलती देऊ

Goa Shack: रोहन खंवटे यांची ग्वाही: कांदोळीत कचरावाहू वाहनाचे उद्‍घाटन

दैनिक गोमन्तक

Goa Shack: नव्या धोरणानुसार किनारी भागातील स्थानिक शॅक व्यावसायिकांना लवकरच व्यवसायासाठी योग्य त्या सवलती देण्यात येतील तसेच गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कुणाचीच अडवणूक होणार नाही, अशी ग्वाही पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी मंगळवारी कांदोळीत दिली.

कांदोळी येथील किनारी भागात पारंपरिक शॅक व्यावसायिकांसाठी पंचायतीतर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या कचरावाहू वाहनांचे(टॅंकर) फीत कापून उद्‍घाटन केल्यानंतर मंत्री खंवटे बोलत होते. दरम्यान,यंदाच्या हंगामातील पहिल्या चार्टर विमानाचे आगमन झालेले असून विदेशी पाहुण्यांना राज्यातील किनारी भागात समाधानकारक सोयी देण्यासाठी पर्यटन खाते नेहमीच अग्रेसर असते असे मंत्री खंवटे यांनी पुढे सांगितले.

गेल्या पर्यटन हंगामात याभागातील कचरा व्यवस्थापनात घोळ झाल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच न्यायालयाकडून 167 शॅक्सना टाळे ठोकण्यात आले यंदा ही समस्या निपटून काढण्यासाठी स्थानिक पंचायतीने पुढाकार घेतला असून टॅंकरची सोय केली आहे. यावेळी कळंगुटचे आमदार मायकल लोबो, स्थानिक सरपंच जोसेफ सिक्वेरा, उपसरपंच गीता परब, रॉयल एक्झॉटीकाचे व्यवस्थापक, भाजपचे कळंगुट संघटक गुरुदास शिरोडकर, पंचायत सचिव अर्जुन वेळीप, पंचायत सदस्य व अन्य मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन पंच सदस्य स्वप्निल वायंगणकर यांनी केले.

सरकारकडे नोकरीची अपेक्षा न धरता शॅक व्यवसाय उभा करणाऱ्या स्थानिक व्यावसायिकांची सतावणूक न करता गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून त्यांना झुकते माप दिले जावे,अशी अपेक्षा आहे.
-मायकल लोबो, आमदार कळंगुट

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Gopal Khemka Murder: बिहार हादरले, गोळ्या घालून प्रसिद्ध उद्योगपती गोपाल खेमका यांची हत्या

SCROLL FOR NEXT