Goa Helipad: फातोर्ड्यात हेलिपॅड व्यवस्थेबद्दल संभ्रम

Goa Helipad: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा उद्‍घाटनाची तयारी: मुख्य सचिवांकडून नेहरू स्टेडियमची पाहणी
Goa Helipad
Goa HelipadDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Helipad: राज्याचे मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल (आयएएस) व पोलिस महासंचालक जसपाल सिंग (आयपीएस) यांनी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरु स्टेडियमला भेट देऊन पाहणी केली व कामाचा आढावा घेतला.

Goa Helipad
Goa School: ताणमुक्तीचे कौशल्य शाळेत शिकवावे

37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा व उदघाटन सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती याबद्दल विचार विनिमय करण्यास व तयारीचा आढावा घेण्यासाठी आज त्यांनी फातोर्ड्याला भेट दिली.

नेहरू स्टेडियमबाहेरील जागा पार्किंगसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. शिवाय परिसरातील टेनिस कोर्ट व इनडोअर स्टेडियममध्ये सुध्दा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील इतर खेळांचे सामने खेळविले जाणार असल्याने हेलिकॉप्टर उतरविणे त्रासदायक ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

दाबोळी विमानतळ ते नेहरू स्टेडियम अंतर वाहनाने केवळ २० ते २५ मिनिटांत कापणे शक्य असल्याने पंतप्रधान विमानतळावरून नेहरु स्टेडियमवर येणे पसंत करतील, असा सूर व्यक्त झाला. या बदलाबद्दल पीएमओशी संपर्क साधला जाईल, असे कळते. मुख्य सचिव गोयल म्हणाले की स्पर्धेच्या उदघाटनापूर्वी सर्व तयारी पूर्ण होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com