Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: लैंगिक अत्याचारानंतर करायला लावत होता गर्भपात, अखेर लग्नास होकार दिल्याने कोर्टाकडून निर्दोष मुक्तता

Goa Crime News: दोघांनी विवाहनोंदणी केलेला दाखला न्यायालयात सादर केल्यावर तसेच अपुऱ्या पुराव्याअभावी संशयिताला निर्दोष ठरवण्यात येत असल्याचे निरीक्षण निवाड्यात केले आहे.

Sameer Panditrao

पणजी: बलात्काराचा आरोप असलेल्या संशयितानेच पीडित तरुणीशी विवाह केल्याने तसेच पीडिता व तपास अधिकाऱ्यांच्या जबाबाव्यतिरिक्त संशयिताविरोधात आरोप सिद्ध करण्यासाठी कोणताही स्वतंत्र पुरावा नसल्याने लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यांतर्गत जलदगती न्यायालयाने संशयितास निर्दोष मुक्त केले.

विवाहाचे आमिष दाखवून जानेवारी २०१८ ते जुलै २०२४ या काळात लैंगिक शोषण करून व त्यानंतर विवाहास नकार देऊन फसवणूक केल्याप्रकरणी पीडित तरुणीने उत्तर गोवा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती.

संशयिताने केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे कित्येकवेळा गरोदर राहिल्यानंतर त्याने विवाह करण्याच्या आश्‍वासनावर गर्भपात करण्यास लावत होता, असे तक्रारीत नमूद केले होते. पोलिसांनी संशयिताला अटक करून वैद्यकीय तसेच इतर पुरावे जमा करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

या आरोपपत्राच्या खटल्यावरील सुनावणीदरम्यान संशयिताने पीडित तरुणीशी रजिस्टर्ड विवाह केला तसेच ते दोघेही आनंदाने राहत असल्याची माहिती पीडितेने न्यायालयात दिली.

तिने संशयिताविरुद्ध दाखल केलेली तक्रार ही गैरसमजुतीने दिल्याचे कबूल केले. हा खटला मागे घेण्यासाठी कोणीही जबरदस्ती केली नाही. तिला हा खटला आणखी पुढे न्यायचा नसल्याने ही सुनावणी बंद करण्याची विनंती न्यायालयाला केली होती. त्या दोघांनी विवाहनोंदणी केलेला दाखला न्यायालयात सादर केल्यावर तसेच अपुऱ्या पुराव्याअभावी संशयिताला निर्दोष ठरवण्यात येत असल्याचे निरीक्षण निवाड्यात केले आहे.

पुरेसे पुरावे नसल्याने, सरकारी वकील संशयिताविरोधात आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरले आहेत. परिणामी, आरोपीला निर्दोष मुक्त करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT