Goa Crime: सायबर स्लेवरी जॉब स्कॅम! कझाकिस्तानच्या नागरिकाला अटक, गोवा पोलिसांनी उधळून लावला मोठा प्लॅन

Cyber slavery scam: या घोटाळ्याचे काही धागेदोरे गोव्यात आहेत का? याचा तपास गोवा पोलिस करतायेत.
Cyber slavery job scam in Goa
Kazakh citizen arrested for cyber scamDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सायबर स्लेवरी जॉब स्कॅमप्रकरणी अटक केलेल्या मूळचा कझाकिस्तानचा नागरिक असलेल्या संशयित तालानिती लुनाक्सी (२२) याचा भारतात सायबर सायबर स्लेवरी कॉल सेंटर सुरू करण्याचा उद्देश होता. त्यासाठी तो हजार ते बाराशे पीडितांना समावेश करता येईल, अशा इमारतीच्या शोधात होता.

या सेंटरचा प्रसार जपान व दक्षिण कोरियामध्ये करण्याचा डाव होता, अशी माहिती शुक्रवारी (२८ मार्च) पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी दिली. विदेशात नोकरीसाठी कोणीही बँक खाते क्रमांक व सिम कार्ड मागितले किंवा गलेलठ्ठ पगाराचे आमिष दाखविले तर यात घोटाळा आहे, ही गोष्ट नागरिकांनी ध्यानात ठेवावी, असाही सल्ला पोलिस अधीक्षकांनी दिला.

Cyber slavery job scam in Goa
Viral Video: ''माझ्या गोव्याच्या भूमित...'', वर्षा उसगांवकर रमल्या समुद्रकिनारी; व्हिडिओ होतोय व्हायरल

गोव्याशी धागेदोरे? तपास सुरु

पोलिस महासंचालक आलोक कुमार व सायबर सुरक्षा विभागाचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, अटक केलेल्या आलेल्या संशयितांकडून नवनवीन माहिती मिळत आहे. या घोटाळ्याचे काही धागेदोरे गोव्यात आहेत का? तसेच संशयितांनी गोव्यातील काही ठकसेनांची घोटाळ्यासाठी मदत घेतली आहे का? या दृष्टिकोनातूनही तपास सुरू आहे.

बँक खाते व सीम कार्ड भाड्याने घेऊन नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणारे हे एक आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे. तपासानंतर किती लोकांची फसवणूक झाली आहे? किती जण या रॅकेटमध्ये आहेत, त्याचा लवकरच उलगडा होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com