Goa Vasco Dainik Gomantak
गोवा

Vasco News: रस्त्यावर सांडपाणी, धोकादायक फांद्या; वास्‍को शहराचे वाजले तीन-तेरा

Goa Rain: शहरातील रस्‍ते खोदून ठेवण्‍यात आल्‍याने सर्वत्र चिखलाचे साम्राज्‍य

गोमन्तक डिजिटल टीम

गेल्‍या काही दिवसांपासून पडत असलेल्‍या मुसळधार पावसाने वास्‍को शहराचे तीन-तेरा वाजवले आहेत. त्‍यामुळे मान्‍सूनपूर्व कामांचा दर्जा पुन्‍हा एकदा उघड झाला आहे. अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली असून जनजीवन विस्‍कळीत झाले आहे. काही ठिकाणी तर मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्यात आलेली नाही. त्‍यामुळे तेथे पाणी साचण्‍याच्‍या प्रकारांत वाढ झाली आहे. परिणामी वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे.

गटार साफ न केल्याने घाणेरडे पाणी रस्‍त्‍यावरून वाहताना दिसते. प्रत्येक ठिकाणी मोठे प्रकल्प आल्याने पाणी जायला वाट नाही. वाहनचालकांना वाहने चालवताना मोठा त्रास सहन करावा लागतोय. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहने पार्क करून ठेवली जातात, तेथे ती अर्धी पाण्‍याखाली गेलेली दिसतात.

वास्कोतील भाजी मार्केटजवळ भररस्त्यात पाणी साचून राहत असल्याने हा परिसर चिखलमय झाला आहे. तेथे फूलविक्रेत्‍यांनी अतिक्रमण केलेले आहे. गटारांवरच आपापली दुकाने थाटल्याने ती साफ करण्यात येत नाहीत.

त्यामुळे प्रत्येक पावसात पूरस्थिती निर्माण होऊन भाजी मार्केटमध्ये येणाऱ्या पादचाऱ्यांना तसेच वाहनचालकांना गटाराच्या पाण्यांतून वाट काढावी लागते. या प्रकारामुळे वास्‍को आणि परिसरात डेंग्यू, मलेरियाची साथ पसरण्‍याची भीती व्‍यक्त केली जातेय. यापूर्वीही या शहराला अशा रोगराईचा फटका बसलेला आहे.

शहरातील रस्‍ते खोदून ठेवण्‍यात आल्‍याने सर्वत्र चिखलाचे साम्राज्‍य पसरले आहे. केबल घालण्यासाठी खोदलेल्या रस्त्यांवर दगडांचे आवरण घालून त्यावर माती ओढली होती. ती माती पावसामुळे वाहून गेल्याने दगड वर आले आहेत. याचा वाहनचालकांबरोबर, पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय.

वाडे-वास्को महामार्गावरील काही वृक्ष कोसळण्याचा मार्गावर आहेत. या वृक्षांच्या काही फांद्या सुकलेल्या अवस्थेत असून वादळी पावसात त्या कोसळू शकतात. त्‍या कापल्‍या नाहीत तर भविष्‍यात मोठा अनर्थ घडण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. वाडे बसथांब्याजवळ असलेला एक वृक्ष तर रस्त्याच्या बाजूने विस्तारला असून तो कधीही उन्‍मळून पडू शकतो. हा वृक्ष पूर्णपणे एका बाजूने झुकलेला आहे.

चिखली इस्‍पितळाच्‍या बाहेरील वृक्ष बनलाय धोकादायक

चिखलीतील उपजिल्हा हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावरील वृक्षही कोसळण्याच्‍या मार्गावर आहे. तो रस्त्याच्या बाजूने झुकला असून कोसळण्यापूर्वीच तो कापणे गरजेचे बनले आहे. हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावर कुंपणाच्या आत असलेला हा वृक्ष कोसळल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते. या हॉस्पिटलमध्ये रोज मोठ्या संख्येने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची वर्दळ असते. कुंपणाबाहेर अनेक वाहनेही पार्क केलेली असतात. तसेच बाहेरही लोक उभे असतात. हा वृक्ष एखाद्या क्षणी त्यांच्यासाठी जीवघेणा ठरू शकतो. रविवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे इस्पितळाच्या कुंपणाचा काही भाग कोसळला. त्यामुळे या कुंपणाला लागून असलेल्या या वृक्षाचा आधार गेला असून, तो केव्हाही कोसळू शकतो.

सडा-वरुणापुरी रस्‍ता वाहतुकीसाठी असुरक्षित

हेडलँड सडा ते वरुणापुरी वास्कोला जोडणाऱ्या नव्याने बांधलेल्या रस्त्यावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. असंख्य अवजड वाहने आणि शेकडो दैनंदिन प्रवाशांसह बंदर वाहतुकीद्वारे मोठ्या प्रमाणात वापरला जाणारा हा महत्त्वाचा मार्ग एक धोका निर्माण करतो. भूस्खलन झालेल्या ठिकाणी मोठ-मोठे दगड रस्त्यावर येण्याच्या मार्गावर आहेत, ज्यामुळे सर्व रस्तावापरकर्त्यांसाठी उच्च-जोखीमीची स्थिती निर्माण झाली आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी आणि जनतेची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अधिकाऱ्यांनी त्वरित हस्तक्षेप करणे अत्यावश्यक आहे.

धोकादायक इमारती पालिकेने ताब्‍यात घ्‍याव्‍यात

वास्को शहरातील अनेक जुन्या आणि धोकादायक इमारती आहेत. या इमारतींच्या मालकांना मुरगाव पालिकेने सुरक्षेच्या दृष्टीने नोटीस पाठवूनही त्‍यांनी त्‍याची दखल घेतलेली नाही. त्या धोकादायक इमारतींमुळे भविष्यात दुर्घटना घडू नये यासाठी पालिकेने त्या इमारती ताब्यात घेऊन पाडणे गरजेचे आहे.

पालिकेने ती जागा ताब्यात घ्यावी, जेव्हा जमिनीचा मालक येईल तेव्हा त्याच्याकडून इमारत पाडण्यासाठी आलेला खर्च वसूल करून जागा परत द्यावी. अशा प्रकारचे पाऊल उचलल्यास धोका टाळता येईल, असे वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी सांगितले. शहरातील विविध भागात अनेक जुन्या इमारती असून, त्यापैकी काही इमारती धोकादायक बनल्या आहेत.

दाजी साळकर, आमदार (वास्‍को)

्मुरगावचा नगरसेवक असताना मी वास्‍कोतील धोकादायक इमारतींबाबत आवाज उठविला होता. त्‍यानंतर मुरगाव नगरपालिकेने या धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटीस पाठवली होती. तरीही त्‍यांनी सुरक्षेच्या दृष्टीने काहीच केले नाही. आता तरी पालिकेने पुढाकार घेऊन कडक पावले उचलणे गरजेचे आहे, जेणेकरून भविष्‍यातील धोका टाळता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT