Vasco News : वास्को बाजारपेठेत छत्र्या, रेनकोट, ताडपत्री दाखल; दर वधारले

Vasco News : नव्या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांकडून पावसाळी वस्तूंची खरेदी
Vasco
Vasco Dainik Gomantak

Vasco News :

वास्को, मॉन्सून जवळ आल्याने वास्को बाजारपेठेत छत्र्या, रेनकोट विक्रीसाठी दाखल झाले आहेत. अद्याप शाळा सुरू झाल्या नसल्या, तरी पालकांकडून मुलांसाठी छत्र्या आणि रेनकोट खरेदी केले जात आहेत. तसेच घरावर घालण्यासाठी प्लास्टिक कापड, ताडपत्री खरेदीकडे कल वाढला असून यंदा गतवर्षीच्या तुलनेत या वस्तूंच्या दरामध्ये वाढ झालेली दिसत आहे.

पावसाळ्याची चाहूल लागली की, रंगीबेरंगी छत्र्यांनी बाजारपेठ फुलते. लहान-मोठे रेनकोटसुद्धा बाजारात दिसू लागतात. प्लास्टिक कापड, ताडपत्री यांनाही मागणी वाढते. मात्र, जास्त वस्तूंची खरेदी केल्यास विक्रेत्यांकडून थोडीफार सूट मिळते. काही ग्रामीण व्यापारीही छत्री, प्लास्टिक ताडपत्री साहित्याची मोठी उचल करत असल्याने सद्यस्थितीत सर्वत्र पावसाळी वस्तूंची विक्री जोरात सुरू असल्याचे दिसत आहे.

राज्यात दुचाकींची संख्या मोठी आहे. शिवाय पायलट व्यवसायासह रेंट ए बाईकचा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात चालतो. साहजिकच त्यांच्याकडून रेनकोटला मोठी मागणी आहे. त्यामुळे रेनकोटचा बाजार वास्कोत तेजीत असल्याचे चित्र दिसत आहे.

कार्टून चित्रांची मुलांना भुरळ

लहान मुलांचा कार्टून हा आवडीचा विषय. त्यामुळे मुलांना रेनकोटवर आवडत्या कार्टूनचे चित्र हवे असते. तोच ट्रेंड पावसाळ्यात छत्र्यांच्या बाबतीत दिसतो. त्यामुळे वेगवेगळी कार्टूनची प्रिंट असलेल्या छत्र्या बाजारात उपलब्ध आहेत. पालक आपल्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारात घेऊन येतात. त्यांना पाहिजे असलेले रेनकोट, छत्री, सॅन्डल खरेदीसाठी मोकळीक दिली जाते.

Vasco
Goa Statehood Day: सावंत सरकारचा धिक्कार... सरकारी जाहिरातीत घटकराज्य दिनाच्या कार्यक्रमाचा साधा उल्लेखही नाही; अमरनाथ पणजीकर बरसले

प्लास्टिक, ताडपत्रीला मागणी

सध्या बाजारात रेनकोट, छत्र्या, प्लास्टिक कापड व ताडपत्री मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. पातळ व जाड अशा प्लास्टिक ताडपत्र्या बाजारात उपलब्ध असून, ४० ते १०० रुपये मीटरपर्यंत त्यांची किंमत आहे. लहान-मोठ्या आकारानुसार रेनकोट ५०० ते १,२०० रुपयांपर्यंत विकले जातात. तर २०० ते ५०० रुपये व त्याहून अधिक किमतीच्या छत्र्या बाजारात उपलब्ध आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com