Vasco Market: वास्कोमध्ये फळविक्रेत्यांवर कारवाई

Action Against Encroachment: पालिकेमार्फत फळ भाजी मार्केट मधील अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरूच राहणार आहे
Action Against Encroachment: पालिकेमार्फत फळ भाजी मार्केट मधील अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरूच राहणार आहे
Vasco Market Action Against EncroachmentDainik Gomantak
Published on
Updated on

मुरगाव पालिकेच्या वास्को येथील फळ भाजी मार्केट मधील विक्रेते चक्क रस्त्यावर बसून व्यवसाय करत असल्याने, वाहन चालकांबरोबर पादचाऱ्यांना खूपच त्रास होतो.याविषयी पालिका अधिकाऱ्यांना माहिती मिळताच, पालिकेने रस्त्यावर राहून फळ-भाजी विकणाऱ्यांवर कारवाई केली.

तसेच भाजी मार्केट मध्ये केलेले अतिक्रमण हटविले. यापुढेही पालिके मार्फत अतिक्रमणाच्या विरोधात कडक कारवाई सुरूच राहिल,असे नगराध्यक्ष गिरीश बोरकर यांनी सांगितले.

वास्को येथील तात्पूरत्या उभारलेल्या मुरगाव पालिकेच्या मासळी मार्केट समोरील फळ, भाजी विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याने, वाहन चालकांना खूपच त्रास सहन करावा लागत होता.

तसेच टिबी कुन्हा चौकात पालिकेच्या मार्केट मध्ये दुकान मालकांनी केलेले अतिक्रमणे हटवण्यात आली. मासळी मार्केट फळ भाजी विक्रेत्यांनी आपला व्यवसाय चक्क रस्त्यावर थाटून पादचारी व वाहन चालकांना अडथळा निर्माण केला होता.

Action Against Encroachment: पालिकेमार्फत फळ भाजी मार्केट मधील अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरूच राहणार आहे
Vasco News : वास्को बाजारपेठेत छत्र्या, रेनकोट, ताडपत्री दाखल; दर वधारले

मुरगाव पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अतिक्रमणाची माहिती मिळताच, पालिका निरीक्षक योगेश देसाई व प्रकाश कादरी यांनी कारवाई करून मासळी मार्केटकडे जाणारा रस्ता मोकळा केला.

मासळी मार्केट मधून टीबी कुन्हा चौकात जाणाऱ्या रस्त्यावर केलेल्या अतिक्रमणावरही पालिकेने कारवाई केली. या रस्त्याच्या दोन्ही बाजूस फूल विक्रेत्या दुकानदारांनी केलेले अतिक्रमण पालिकेच्या कामगारांना हटविले.

यापुढेही मुरगाव पालिकेमार्फत फळ भाजी मार्केट मधील अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरूच राहणार आहे. शहरात रस्त्यावर राहून बेकायदेशीररित्या व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती नगराध्यक्ष गिरीश बोरकर यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com