Water Problem Dainik Gomantak
गोवा

Water Problem: हरमल परिसरात तीव्र पाणी टंचाई

Water Problem: हरमल परिसरात तीव्र पाणी टंचाई

दैनिक गोमन्तक

Water Problem: हरमल येथील कित्येक भागांत नळ जोडणीतून पाणीपुरवठा होत नसल्याने टँकरने पाणीपुरवठा सुरू होता, पण गेले काही दिवस कंत्राटाची मुदत संपल्यामुळे पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या भागात तीव्र पाणी टंचाई सुरू आहे.

ग्रामस्थांचे हाल होत असून कंत्राट संपल्याचे कारण सांगून ग्राहकांची दिशाभूल केल्याने नागरिक संतप्त होत आहेत.

भागातील विशेषतः मधलावाडा, बामणभाटी भागात नळ जोडणी असलेल्या ग्राहकांना अत्यल्प प्रमाणात पाणी पुरवठा होत असल्याने ग्राहक नाराज आहेत.

व्यवस्थित पाणीपुरवठा करण्यासाठी ग्राहकांनी अनेकदा खात्याच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना घेऊन जोडण्यातील अडथळे दूर करण्याचे प्रयत्न केले.

कित्येक भागांत नळ जोडणी असूनही पाणीपुरवठा होत नसल्याने ग्राहकांसाठी टँकरने पाणीपुरवठा हा उत्तम पर्याय आहे. सरकारने तोडगा काढण्यासाठी पावले उचलली पाहिजे, असे मत नागरिक व्यक्त करतात. टँकरचे कंत्राट संपल्याचे कारण सांगून खाते जबाबदारी झटकत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

आमदारांनी लक्ष द्यावे

अत्यल्प प्रमाणात पाणीपुरवठा होऊनही दर महिन्याची बिले भरली जाता, पण पाणीपुरवठ्याकडे दुर्लक्ष केले जाते. सरकार सध्या मोफत पाणीपुरवठा योजना राबवीत असले, तरी लोकांपर्यंत ते पाणी पोचत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. आमदार जीत आरोलकर यांनी पाणीपुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांशी बोलणी करून लोकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सर्व थरातून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT