Goa News: हरमल सरपंच करणार नाईट पेट्रोलिंग

Goa News: रस्त्यांच्या बाजूचा कचरा हटवला : उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांची आता खैर नाही
Goa News
Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: हरमल पंचायत क्षेत्रात उघड्यावर फेकण्यात येणाऱ्या कचऱ्या विरोधात प्रसार माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर हरमल पंचायतीला जाग आली असून सरपंच रजनी इब्रामपूरकर यांनी स्वत: पुढाकार घेउन आपल्या देखरेखीखाली पंचायत क्षेत्रातील विविध रस्त्यांच्या बाजूला विखुरलेला कचरा कंत्रदारामार्फत हटवला.

दरम्यान, उघड्यावर कचरा फेकणाऱ्यांवर कडक कारवाईचा तसेच रात्रीच्या वेळी रस्त्यावर पेट्रोलिंग करण्याचा इरादा इब्रामपूरकर यांनी व्यक्त केला आहे.

हरमल पंचायत क्षेत्रात उघड्यावर फेकण्यात येणाऱ्या कचऱ्याची समस्या उग्र होत चालली होती. हरमल पंचक्रोशी हायस्कूल संकुल परिसर, मिठागर पेट्रोल पंप, केपकरवाडा, मधलावाडा या भागांतील रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात कचरा विखुरला होता.

केपकरवाडा येथे कचरा उचल करणाऱ्या कंत्राटदाराने रस्त्याच्या बाजूलाच कचरा साठवून ठेवल्यानेही हा परिसर दुर्गंधीमय झाला होता.

Goa News
Goa Politics: केंद्रात युती तुटली तरी गोव्यात एकी राहावी

नागरिक तसेच पर्यटकांना नाकतोंड दाबून या भागातून प्रवास करावा लागायचा. या विरोधात प्रसारमाध्यमांनी आवाज उठवल्यानंतर हरमल पंचायतीने याची गंभीर दखल घेतली व सरपंच रजनी इब्रामपूरकर यांनी पुढाकार घेउन आपल्या देखरेखीखाली पंचायत क्षेत्रातील प्रमुख रस्त्यांच्या बाजूला फेकण्यात आलेला कचरा कंत्राटदारामार्फत हटवला. यापुढे रस्त्याच्या बाजूला कचरा टाकताना आढळल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा इब्रामपूरकर यांनी दिला आहे.

दरम्यान, मेथरवाडा येथील नवीन घरांना जोडणाऱ्या रस्त्याच्या बाजूला सध्या मोठ्या प्रमाणात कचरा विखुरलेला आहे. अज्ञाताकडून आपल्या आस्थापनांतील वा घरातील कचरा प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून टाकण्याचा प्रकार सुरू आहे. मागच्या वर्षी विदेशी पर्यटकांनी या परिसराची साफसफाई केली होती.

Goa News
Goa Congress: दक्षिण गोव्यात उमेदवार कोण, यावरच काँग्रेसचे भवितव्य !

सरपंचांचे नागरिकांना आवाहन : सरपंच रजनी इब्रामपूरकर यांनी नागरिक तसेच व्यावसायिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा. तसेच कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी. उघड्यावर किंवा रस्त्याच्या बाजूला कचरा फेकू नये. कचरा गोळा करणाऱ्या कामगारांकडे कचरा द्यावा. कचरा व्यावस्थापन ही केवळ पंचायतीची जबाबदारी नाही, प्रत्येक नागरिकानेही आपापली जबाबदारी ओळखू हरमल गाव स्वच्छ राखण्यास योगदान द्यायला हवे.

कचरा टाकणाऱ्यावर कारवाई होणार

रस्त्यांच्या बाजूला विखरून असलेला सर्व कचरा उचलला जाणार आहे. तसेच उघड्यावर किंवा रस्त्या बाजूला कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच आपण स्वतः रात्रीच्या वेळी पंचायत क्षेत्रातील रस्त्यांवर पेट्रोलिंग करणार आहे.

- रजनी इब्रामपूरकर, सरपंच हरमल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com