Shigmo Parade
Shigmo Parade Dainik Gomantak
गोवा

अनेक फ्लोट कलाकारांचा यावर्षीच्या शिगमो परेडवर बहिष्कार

दैनिक गोमन्तक

फोंडा : गेल्या वर्षी राज्य सरकारने कोरोना कारणामुळे शिगमो फ्लोट परेड अचानक रद्द केली होती. त्यामुळे अनेक फ्लोट कलाकारांचे प्रचंड नुकसान झाले होते. तर यात भर म्हणून राज्य सरकारने नुकसान भरपाई ही दिली नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या अनेक फ्लोट कलाकारांनी यावर्षीच्या शिगमो परेडवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या वर्षी, कोरोना (Corona) कारणामुळे सरकारने परेडच्या फक्त तीन दिवस आधी शिगमो फ्लोट परेड अचानक रद्द केली. याचे कारण कोरोनाबाधीतांच्या संख्येत होणारी वाढ होती. त्यावेळी सरकारने फ्लोट कलाकारांना नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ती नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही, असे शिगमो कलाकारांचे म्हणणे आहे. तर एका अंदाजानुसार, दर्जेदार फ्लोट निर्मितीसाठी 25 हून अधिक तरुण काम करतात. तर याचा खर्च हा सुमारे 3 लाखांपर्यंत जातो. पण हा झालेला खर्च देखील त्यांना मिळणाऱ्या बक्षिसाच्या रकमेतून वसूल होत नाही.

मात्र, गेल्या वर्षी शिगमो कलाकारांचे मोठे नुकसान झाले. गेल्या वर्षीच्या कटू अनुभवांमुळे अनेक फ्लोट कलाकारांनी या वर्षीच्या फ्लोट परेडमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. तर फोंडामध्ये, 6 फ्लोट ट्रॉप्सपैकी फक्त 3 सहभागी होत आहेत.

याप्रकरणी बोलताना ढवळी येथील श्री भगवती कला संघाचे कलाकार (Artist) अतुल नाईक आणि बिपीन नाईक यांनी सांगितले की, ते गेल्या दहा वर्षांपासून फ्लोट तयार करत आहेत. पण ते या वर्षी फ्लोट स्पर्धेत भाग घेणार नाहीत. कारण त्यांचे 2 लाख रुपयांचे नुकसान झाले होते. तर अतुल नाईक म्हणाले की, पूर्वी गोव्यात 15 ठिकाणी ही स्पर्धा भरवली जायची, ज्यामुळे आम्हाला बक्षिसे जिंकून खर्च वसूल होत होता. पण “या वर्षी अर्धाही खर्च वसूल करू शकणार नाही कारण ही स्पर्धा फक्त फोंडा मडगाव, वास्को, पणजी आणि म्हापसा अशा पाच ठिकाणी होणार आहे.

तर यावर बिपीन नाईक म्हणाले की, फ्लोट्स तयार करण्यामागचा उद्देश हा फक्त पैसे कमविणे नाही. त्यांच्या कलेचे चित्रण करणे आहे, ज्यामुळे त्यांना खूप समाधान मिळते. तसेच कलाकारांना फ्लोट्स तयार करण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदतीची गरज आहे. जर सरकार कलाकारांना मदत करण्याचे आश्वासन पूर्ण करत नसेल तर आम्ही कोणत्या आधारावर फ्लोट्स तयार करू, असा सवाल त्यांनी केला.

तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी गेल्या वर्षी विधानसभेत परेड रद्द केल्यामुळे कलाकारांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सरकार आश्वासन पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहे. तर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलेली आश्वासने न पाळल्यास कलाकार फ्लोट तयार करणार नाहीत अशी भीती त्यांना होती. यावर, माशेल नागरीक समितीचे मुख्य कलाकार संजय नावेलकर यांनी सांगितले की, त्यांची मंडळी फ्लोट स्पर्धेत सहभागी होणार नाहीत कारण ती आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही. शिवाय महोत्सवासाठी फक्त एक महिना शिल्लक आहे, जो दर्जेदार फ्लोट तयार करण्यासाठी अपुरा आहे.

“कलाकार म्हणून, आम्ही नेहमीच लोकांचे मनोरंजन करण्याचा आणि त्यांच्या कौतुकातून समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो. आम्ही पैसे कमावण्यासाठी हे करत नव्हतो. परंतु आम्हाला किमान बांधकाम खर्च वसूल करणे आवश्यक आहे, जे कार्यक्रम केवळ पाच ठिकाणांपुरते मर्यादित ठेवल्यास ते वसूल केले जाऊ शकत नाही,” असेही नावेलकर म्हणाले.

फ्लोट तयार करणे काही सोपे नाही. यासाठी दोन डझनहून अधिक कलाकारांसह किमान दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो. तर तीन ते पाच लाखांचा खर्च येतो. शिवाय वाहतुकीसाठी 25 हजार रुपये खर्च येतो, असे आडपोईतील पंच सदस्य मशाल आडपोईकर यांनी सांगितले.

याचबरोबर आडपोईकर यांनी, “सरकारने फ्लोट स्पर्धांसाठी बक्षीसची रक्कम वाढवली पाहिजे. त्याचबरोबर प्रत्येक मंडळासाठी सांत्वन पारितोषिक म्हणून किमान 10,000 रुपयांची तरतुद व्हावी. गोव्यात किमान दहा ठिकाणी या स्पर्धा आयोजित केल्या जाव्यात. जेणेकरून सहभागींना फ्लोटची किंमत वसूल करता येईल. सरकारने (Government) गुणवत्तेच्या आधारावर फ्लोट्सचे अ, ब आणि क वर्गीकरण केले पाहिजे आणि त्यानुसार त्यांचे समर्थन ही व्हावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Session Court: वेश्याव्यवसाय प्रकरणी दोषी ठरलेल्या विजय सिंग याला गुरुवारी ठोठावली जाणार शिक्षा

Canacona: तपासणी टाळण्यासाठी समुद्रातून मद्य तस्करी; काणकोण येथे एकाला अटक

Goa SSC Result Declared: यंदाही मुलीच हुश्शार, गोव्यात दहावीचा 92.38 टक्के निकाल

Xeldem Assault Case: आंब्यावरुन मारहाण, सोनफातर - शेल्‍डे येथे बागमालकास जीवे मारण्याची धमकी

Goa Today's Top News: दहावीचा निकाल, अपघात, चिरे खाणीवर छापा; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT