पंचायत निवडणुकांबाबत प्रश्नचिन्ह? गोवा फॉरवर्डकडून निवडणूक आयुक्तांना पत्र

10 मार्चपर्यंत सीमांकन प्रक्रिया स्थगित ठेवावी; गोवा फॉरवर्ड
Goa Forward to Election Commissioner
Goa Forward to Election CommissionerDainik Gomantak

गोवा फॉरवर्डने राज्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून पंचायत (Panchayat) निवडणुकांसाठी सीमांकन प्रक्रिया ज्या घाईघाईने पार पाडली जाते त्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महानगरपालिका निवडणुकीमध्ये किती हेराफेरी झाली हे आपण यापूर्वी पाहिले आहे ज्यासाठी आपल्याला सर्वोच्च न्यायालयात जाऊन न्याय मागावा लागला. याची आठवण करून देत गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी निवडणूक (Election) आयुक्तांना पत्र पाठवले आहे. तसेच 10 मार्चपर्यंत सीमांकन प्रक्रिया स्थगित ठेवावी अशी विनंती देखील गोवा फॉरवर्डने (Goa Forward) एसईसीला लिहिलेल्या पत्रात केली आहे.

Goa Forward to Election Commissioner
विजयकुमार वेरेकरांना केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाचा पुरस्कार जाहीर

उत्तर व दक्षिण गोव्‍यातील (goa) दोन जिल्‍हा पंचायतींच्‍या 50 मतदारसंघातील 19 सर्वसाधारण, तर 31 आरक्षित मतदारसंघ जाहीर केले होते. या आरक्षित मतदारसंघात 14 इतर मागासवर्गीय, 6 अनुसूचित जमाती व 1 अनुसूचित जमाती व 10 महिलांसाठी राखीव ठेवले होते. महिलांसाठी एकूण 17 मतदारसंघ आरक्षित ठेवले होते. निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असताना अचानक कोरोना (Corona) महामारीचे संकट आले आणि उमेदवारांच्‍या मेहनतीवर पाणी फिरले. निवडणूक जाहीर झाल्‍यास आता तब्‍बल सहा महिन्‍यांचा कालावधी लोटला. तेव्‍हाची व आताची परिस्‍थिती वेगळी असल्‍याने इच्छूक उमेदवारांना आता पहिल्‍यापासून प्रयत्‍न सुरू करावे लागणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com