गोवा म्हणजे कलाकारांची खाण

गोवा (Goa) राज्य हे कलाकारांची खाण म्हणून संबोधले जाते. तसेच मुरगाव तालुक्यातही कलेची वारसा जपलेले अनेक दिग्गज कलाकार गोव्यातील या मातीत जन्मलेले आहेत.
Vasco
VascoDainik Gomantak

वास्को: गोवा राज्य हे कलाकारांची खाण म्हणून संबोधले जाते. तसेच मुरगाव तालुक्यातही कलेची वारसा जपलेले अनेक दिग्गज कलाकार गोव्यातील (Goa) या मातीत जन्मलेले आहेत. पण गेली अनेक वर्षे मुरगाव तालुक्यातील या कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी तसेच इतरांच्या कलांचा आस्वाद घेण्यासाठी रसिकांनाही मुरगाव (Murgaon) तालुक्यामध्ये मनोरंजनासाठी कुठल्याही प्रकारच्या सुविधा नसल्याने वंचित रहावे लागले होते. (Veteran Artists Were Born In Goa)

त्यामुळे अशा वंचित कलाकार आणि प्रेक्षकांचा रोष दूर करण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या बायणा येथील रवींद्र भवनला आठ वर्षे पूर्ण झाली आहे. या काळात व्यवस्थापनाने आयोजित केलेल्या विविध भरगच्च कार्यक्रमांचा कलाकार तसेच प्रेक्षकांनी मनसोक्त आनंद लुटला.रवींद्र भवनला आठ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आज वार्षिक सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांनी 2004 साली बायणा वेश्या वस्ती भुईसपाट केल्यामुळे पर्रीकर यांचे सर्व थरातून अभिनंदन होत होते.त्यानंतर त्या ठिकाणी कोणता प्रकल्प येणार याविषयाची चर्चा सर्व थरातून होऊ लागली. त्यातल्या त्यात सरकारने येथील कलाकारांची तसेच प्रेक्षकांच्या भावनांची दखल घेऊन रवींद्र भवन प्रकल्पाला प्राधान्य देत 19 डिसेंबर 2007 रोजी माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ उद्योजक तथा माजी आमदार स्व. वसंतराव ऊर्फ अण्णा जोशी यांच्या हस्ते पायाभरणी केली. तर 12 डिसेंबर 2013 रोजी कला व सांस्कृतिक मंत्री दयानंद मांद्रेकर यांच्या हस्ते रवींद्र भवनाचे उद्घाटन झाले.

Vasco
आमदार अपात्रता याचिकेवर मगोपची भूमिका काय? सुदिन ढवळीकर म्हणतात...

दरम्यान, सुरूवातीला हे रवींद्र भवन म्हणजे पांढरा हत्ती आहे असेच काहींना वाटत होते. पण कालांतराने स्थानिक आमदार आणि वीजमंत्री मिलिंद नाईक यांनी कलाकारांच्या आग्रहानुसार अध्यक्षपदाची सूत्रे आपल्याकडे घेताना रवींद्र भवनात लहान थोर कलाकारांना त्यांच्या कलेची कदर करत विविध कार्यक्रम आखले. मुरगाव तालुक्यातील कलाकारांना व प्रेक्षकांना या भवनची खरोखरच आवश्यकता होती हे सिद्ध करून दाखविले. वीजमंत्र्यांनी आपल्या नेतृत्वाखाली कार्यक्षम अशा समितीची निवड केली. यामध्ये उपाध्यक्ष म्हणून उद्योजक चंद्रकांत गावस तसेच व्यवस्थापक म्हणून अरुण लोलयेकर व संचालक मंडळावर माजी नगराध्यक्ष शेखर खडपकर, समाजसेवक आत्माराम नार्वेकर, उमेश साळगावकर, नाट्य कलाकार श्याम च्यारी, उद्योजक संजय सातार्डेकर, नयना बांदेकर व अन्य मान्यवरांना समाविष्ट केले होते.

रवींद्र भवनच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत व्यवस्थापनाने उत्कृष्ट पद्धतीने नियोजन करताना अनेक कार्यक्रमांचे यशस्वीपणे आयोजन केले आहे. सुरूवातीला पहिल्याच वर्षी 182 कार्यक्रम आयोजित करताना मराठी, कोकणी नाटकांसह कार्यशाळा व स्नेहसंमेलनांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन सर्व गटातील कलाकारांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. डिसेंबर 2014 ते नोव्हेंबर 2015 पर्यंत व्यवस्थापनाने प्रत्येक महिन्यामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करताना गोमंतकीय लोकनृत्यावर आधारित कार्यशाळा, रेशमी धागा तयार करण्यासाठी कार्यशाळा, रांगोळी कार्यशाळा, फेटा बांधणी कार्यशाळा, छायाचित्रण कार्यशाळा,पारंपरिक पेहराव कार्यशाळा, नृत्यावर आधारित कार्यशाळा, वेगवेगळ्या छायाचित्रांचे प्रदर्शन, जुनी संगीत मराठी नाटके, मराठी नाट्यमहोत्सव, गुजराती नाटकांचे आयोजन, कोकणी नाटक व तियात्रांचे आयोजन, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम, शालेय विद्यार्थ्यांना संमेलनासाठी व्यासपीठ, गायन, वादन व नृत्य प्रशिक्षणाचे आयोजन, प्रदर्शन व विक्री आदी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे.

Vasco
गोवा: सुदिन ढवळीकरांच्या अपात्रता याचिकेवर सभापती करणार सुनावणी

उपाध्यक्ष चंद्रकांत गावस यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र भवनचे कर्मचारी मोठ्या उत्साहाने प्रत्येक कार्यक्रमात, प्रेक्षकांना मदत करीत होते. त्यांच्या या यशाने रवींद्र भवन म्हणजे स्थानिक कलाकार आणि प्रेक्षकांना एक पर्वणीच ठरलेली आहे.

दरम्यान कोविड महामारी (Covid epidemic) काळात रवींद्र भवन च्या सर्व कार्यक्रमांना उतरती कळा लागली. सांस्कृतिक कार्यक्रम तसेच इतर कार्यक्रमांना ब्रेक लागल्याने संगीत रसिक प्रेक्षककांबरोबर, कलाकारांना या सर्व कार्यक्रमापासून वंचित राहावे लागले. यात कोविड महामारी पासून थोडीफार उसंत मिळाल्यानंतर काही मोजकेच कार्यक्रम झाले. मात्र रवींद्र भवन मधील संगीत वर्ग विद्यार्थी वर्ग नसल्याने कायमचे बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे येथील संगीत शिक्षक वर्ग विनाकाम बसून राहतात. त्यांना कला आणि संस्कृती संचालनालय किंवा एखाद्या शाळेत त्यांची रवानगी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.एकीकडे सरकार पैसे नसल्याचे सांगतात.मात्र या संगीत शिक्षकांना फुकटचे वेतन द्यावे लागते.तेव्हा याचा संबंधित खात्याने विचार करून त्या संगीत शिक्षकांची इतरत्र बदली करण्याची मागणी होत आहे.

दरम्यान रवींद्र भवनच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त रवींद्र भवनच्या कर्मचारी वर्गांतर्फे वर्षपद्धतीप्रमाणे सत्यनारायण महापूजेचे आयोजन रवींद्र भवनचे अध्यक्ष जयंत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. सदर सत्यनारायण महापूजा उद्या शुक्रवारी रोजी दुपारी 3 वाजता श्री विश्वनाथ मनोहर तळेकर यांच्या यजमानपदाखाली होणार असून संध्याकाळी 5 वाजता आरती व तीर्थप्रसाद त्यानंतर भजनाचा कार्यक्रम होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com