Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa: ड्रग माफिया विरोधात तीन महिन्यात कडक कारवाई - मुख्यमंत्री सावंत यांचे आश्वासन

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यातील ड्रग माफिया (Drug Mafias) विरोधात येत्या तीन महिन्यात कडक करवाई करणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant ) यांनी आश्वासन दिले आहे. वैयक्तिक या प्रकरणात लक्ष घालून याची पाळमुळ नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले. एका वृत्तवाहिनेला दिलेल्या मुलाखतीत सावंत यांनी याबाबत माहिती दिली.

देशभरात चर्चेत असलेले भाजप नेत्या सोनाली फोगाट (Sonali Phogat) यांच्या हत्या प्रकरणामुळे गोव्यातील ड्रगचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, 'गोव्यातून ड्रग हद्दपार करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. अमली पदार्थ विरोधी पथकाला अजून मजबूत करण्यासाठी त्यांना आवश्यक मनुष्यबळ पुरवले जाईल. आमचा गृह विभाग याविरोधात कडक कारवाई करेल, जेणेकरून यापुढे अमली पदार्थाच्या घटना गोव्यात घडणार नाहीत. गोव्यात येणारे पर्यटक आनंद लुटण्यासाठी येतात न की ड्रग घेण्यासाठी हा मेसेज लोकांपर्यंत जाणे आवश्यक आहे.' असे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, सोनाली फोगाट प्रकरणाचा तपास सीबीआयकडे (CBI) देण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, 'हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी (Haryana CM) फोगाट प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याबाबत मला वनंती केली आहे. पण, गोवा पोलिसांनी (Goa Police) याप्रकरणात आजवर पाच जणांना अटक केली आहे. याची चौकशी देखील सध्या वेगात सुरू आहे. तपासाचा अहवाल तसेच, गोपनीय अहवाल देखील हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना पाठवला आहे.' पण, या फोगाट प्रकरणाच्या तपासावरून आम्ही समाधानी असल्याचे सावंत म्हणाले. तसेच, सोनाली फोगाट प्रकरणात कुठलाही आरोपी सुटणार नाही असे प्रमोद सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

SCROLL FOR NEXT