Yuri Alemao : कुडचडेतील गोळीबार हा रेती माफियाला दिलेल्या प्रोत्साहनाचाच परिणाम

काँग्रेस नेते युरी आलेमाव यांचा सरकारच्या अपयशावर ठपका
Yuri Alemao
Yuri Alemao Dainik Gomantak
Published on
Updated on

Yuri Alemao : रेती उत्खनन कामाचे नियमन करण्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचे अपयश आणि बेकायदा रेती व्यवसायाला दिलेले प्रोत्साहन यामुळेच कुडचडेत गोळीबाराची घटना घडली आहे. कुडचडे येथे बंदुकीच्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे, त्याला सरकारच जबाबदार आहे असा सनसनाटी आरोप काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि कुंकळ्ळीचे आमदार आमदार युरी आलेमाव यांनी केला आहे.

कुडचडे येथे आज गुरुवारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना युरी आलेमाव यांनी रेती आणि चिरे व्यवसायातील बेकायदेशीर कामांना प्रोत्साहन देण्याच्या भाजप सरकारच्या अजेंड्यावर जोरदार टीका केली.

गोव्यात पर्यावरणाचा ऱ्हास जोरात सुरू आहे. गोव्यात कार्यरत असलेल्या विविध माफियांकडे सरकार जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहे. भाजप सरकार गोमंतकीयांना सणासुदीच्या काळात सुद्धा सुरक्षा पुरवू शकत नाही हे दुःखद आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.

Yuri Alemao
Amit Patkar : कुडचडेची वाटचाल बिहारच्या दिशेने

भाजप सरकारच्या बेजबाबदार वृत्तीमुळेच गोव्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे आणि त्यामुळेच गुन्हेगार दिवसाढवळ्या गुन्हे करण्यास धजत आहेत. लोकांवर कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या अधिकार्‍यांची भीती नाही. पोलीस व इतर अधिकारी सरकारचे कठपुतळे बनल्याने त्यांनी सर्व विश्वासार्हता गमावली आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.

पोलिस अधिकार्‍यांनी त्वरीत कारवाई करावी आणि कुडचडे येथील घटनेत सहभागी असलेल्या सर्वांना त्वरीत अटक करावी अशी माझी मागणी आहे. गोव्याच्या पोलीस महानिरीक्षकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन गोळीबाराच्या घटनेच्या मूळ कारणाचा शोध घ्यावा आणि यातील मास्टरमाइंडला देखील त्वरित जेरबंद करावे अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com