Serendipity Arts Festival Dainik Gomantak
गोवा

Serendipity Arts Festival: बहुविध कलांचा मोठा महोत्सव! 'सेरेन्डिपिटी'साठी सजतेय पणजी; जगभरातील कलाकार-प्रेक्षक येणार एकत्र

Serendipity Arts Festival 2025: मांडवी नदीकाठच्या ठिकाणी आणि इतर सार्वजनिक स्थळी विविध प्रकारचे कलाप्रदर्शन, कार्यक्रम आणि कार्यशाळा त्यानिमित्ताने आपल्याला अनुभवता येणार आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

पर्पल फेस्ट, इफ्फी या दोन बहुचर्चित महोत्सवांनंतर आता दक्षिण आशियातील बहुविध कलांचा सर्वात मोठा महोत्सव, ‘सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल’ १२ ते २१ डिसेंबरदरम्यान पणजी शहरात अवतरत आहे.

मांडवी नदीकाठच्या ठिकाणी आणि इतर सार्वजनिक स्थळी विविध प्रकारचे कलाप्रदर्शन, कार्यक्रम आणि कार्यशाळा त्यानिमित्ताने आपल्याला अनुभवता येणार आहेत. गेल्या दहा वर्षांत ‘सेरेन्डिपिटी’ हा केवळ एक महोत्सव न राहता, भारत आणि जगभरातील कलाकार आणि प्रेक्षकांना एकत्र आणणारा मोठा सांस्कृतिक मंच बनला आहे.

या वर्षी गोव्यात पाऊल टाकण्यापूर्वी हा महोत्सवाने बर्मिंगहॅम, अहमदाबाद, दिल्ली, वाराणसी, चेन्नई, गुरुग्राम, दुबई आणि पॅरिस अशा अनेक शहरात आपल्या 10व्या आवृत्तीची झलक दाखविणारे कार्यक्रम सादर केले आहेत.

या महोत्सवात जागतिक दर्जाचे विविध कार्यक्रम आपल्याला अनुभवता येतातच पण या महोत्सवाचे सर्वात मोठे पण फार चर्चिले न जाणारे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या आवृत्तीपासूनच ‘एक्सेसीबिलीटी’ म्हणजेच कला सर्वांसाठी खुली असावी हे त्याचे प्रमुख ध्येय राहिले आहे.

यंदाही कवी आणि कलाकार सलील चतुर्वेदी यांच्या क्यूरेशनखाली ही संकल्पना महोत्सवाच्या केंद्रस्थानी असणार आहे. “कला प्रत्येकाची असली पाहिजे. कुणालाही बाहेर ठेवायचे नाही. ‘एक्सेसीबिलीटी’ म्हणजे केवळ साधनसुविधा नाहीत, तर तो सन्मान आणि सहभाग आहे.” असे ‘सेरेन्डिपिटी’चे संस्थापक सुनील कांत मुंजाल म्हणतात.

यंदाच्या ‘सेरेन्डिपिटी’त ‘सेन्टेड स्टोरीज’ ही सुगंध आणि कथाकथन यांचा संगम असलेली अनोखी कार्यशाळा, ‘हँड/आय’ हा स्पर्शाच्या माध्यमातून ‘बघण्याचा’ अनुभव प्रदान करण्याची जागा, ‘ब्रिद + साऊंड इमर्शन’ हे श्वसन व ध्वनी-चिकित्सेचे ध्यानात्मक सत्र, ‘स्टुडीयो मी’ हे सर्वांसाठी खुले असणारे कला-जगत, ‘सेन्सरी रूम’ ही न्यूरोडायव्हर्स आणि सामान्य प्रेक्षकांसाठी शांतता आणि स्थिरतेचा अनुभव देणारी जागा ह्या महोत्सवात महत्त्वाचा ‘एक्सेसीबिलीटी’ (समावेशक) अनुभव देतील.

क्यूरेटर तनुल विकमशी यांची ‘पेपर टू स्कल्पचर’ ही कार्यशाळा पुनर्वापर आणि मिळून कलाकृती तयार करण्यावर भर देते.

‘नेचर्स सिम्फनी: अ बर्डवॉचिंग एडवेन्चर’ हे दृष्टीबाधितांसाठी तयार केले गेलेले अनोखे पक्षीनिरीक्षण सत्र आहे, ‘दॅरफॉर आय एम’ हे दिव्यांगत्वाशी संबंधित अनुभवांवर आधारित सात कलाकारांनी तयार केलेले प्रदर्शन आहे, ‘सायलंट रिदम्स’ हे भारतातील पहिल्या मूक-कलाकार गटाचे सादरीकरण वगैरे सादरीकरणे विशेष व्यक्तींकेन्द्रित आहेत.

त्याशिवाय पंचतंत्र स्टोरीज तसेच सिनेमा फॉर एव्हरी सेन्समध्ये हिंदी चित्रपटांचे ऑडिओ-वर्णन ऐकायला मिळेल. महोत्सवाच्या संचालिका स्मृती राजगडिया म्हणतात, ‘या उपक्रमात फक्त ‘समावेशन’ नाही, तर कला अनुभवण्याच्या संकल्पनेला विस्तार देण्याचा तो मार्ग आहे.’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: धक्का लागताच मेट्रोत दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी, केस ओढत एकमेकींना बदडले; व्हायरल व्हिडिओ पाहून यूजर्स म्हणाले, 'रिअ‍ॅलिटी शो पेक्षाही डेंजर'

शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! गोव्यात विद्यार्थ्यांचा प्रवास आता अधिक सुरक्षित; बस चालकांसाठी 'पोलीस व्हेरिफिकेशन' बंधनकारक

Surya Gochar 2026: 11 जानेवारीपर्यंत सूर्य देवाची विशेष कृपा! 'या' 3 राशींच्या नशिबात राजयोग; सोन्यासारखे चमकतील दिवस!

Konkan Tourism: गर्दीपासून दूर, निसर्गाच्या कुशीत! नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी कोकणातील 'ही' 5 शांत ठिकाणं आहेत बेस्ट

घराजवळ चर्च आहे का? गोव्यात घर घेतल्यानंतर अर्शद वारसीच्या सासू-सासऱ्यांनी त्याला पहिला प्रश्न काय विचारला? VIDEO

SCROLL FOR NEXT