Serendipity Festival 2025: सेरेंडिपिटीमध्ये कोणती नाटके पाहायला मिळणार? वाचा माहिती..

Serendipity Festival Plays: आशय आणि सादरीकरण यांचा एक विलक्षण समसमा संयोग या महोत्सवात सादर होणाऱ्या नाटकांमध्ये प्रेक्षक अनुभवतात.
Serendipity Festival Plays
Serendipity Festival PlaysDainik Gomantak
Published on
Updated on

सेरेंडिपिटी कला महोत्सवात सादर होणाऱ्या नाटकांचा दर्जा नेहमीच उच्च राहिला आहे. आशय आणि सादरीकरण यांचा एक विलक्षण समसमा संयोग या महोत्सवात सादर होणाऱ्या नाटकांमध्ये प्रेक्षक अनुभवतात. यंदाही या महोत्सवात सुमारे 13 नाटके प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. त्यात 'द लिजेंड ऑफ खसक' सारखे खुल्या जागेत (ओपन एअर एरिना) सादर होणारे नाटक आहे  तसेच प्रोसीनियमच्या चौकटीत सादर होणारे 'गोष्ट संयुक्त मानापमानाची' हे मराठी नाटकही आहे. 

गोष्ट संयुक्त मानापमानाची

हे नाटक १९२०च्या दशकातील मराठी रंगभूमीवरील दोन दिग्गज कलाकारांची कहाणी सांगते. या दोन्ही कलाकारांच्या स्वतःच्या वैयक्तिक नाटक कंपन्या होत्या- संगीतसूर्य केशवराव भोसले यांची ललित कलादर्श तर बालगंधर्वांची गंधर्व नाटक कंपनी. या दोघांनी मिळून एकत्रितपणे ‘संगीत मानापमान’ हे नाटक सादर केले होते.‌ स्वतःची व्यावसायिक गणिते असतानाही या कलाकारांनी टिळक स्वराज्य निधी उभारण्यासाठी ‘संगीत मानापमान’मध्ये एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला. हा प्रयोग मराठी रंगभूमीचा इतिहास सात महिलाचा दगड ठरला. हे नाटक त्या प्रयोगासंबंधी आहे. 

दिग्दर्शक: ऋषिकेश जोशी भाषा: मराठी कालावधी: १८० मिनिटे

यु रियली वॉन्ट टू नो माय स्टोरी?

आजच्या काळातही भारतात मृत्युदंड अस्तित्वात आहे. हे नाटक मृत्युदंडाची शिक्षा भोगत असलेल्या दोन कैद्यांची कहाणी आहे. त्यातील एक कहाणी खालच्या जातीच्या एका बसचालकाची तर दुसरी एका मुस्लिम स्थलांतरित कामगाराची आहे. या दोन्ही कहाण्या हालचाली, मजकूर आणि संगीत या माध्यमातून सांगितल्या जातात. अनेक कैद्यांचे, त्यांच्या कुटुंबीयांचे आणि तुरुंगातील परिस्थितीच्या तपशीलांचा अभ्यास करूनच हे नाटक सादर करण्यात आले आहे. 

लेखन-दिग्दर्शन: माया कृष्णा राव

भाषा: हिंदी, इंग्रजी, कालावधी ३५ मिनिटे 

निहसांगो ईश्वर: दी लोनलिनेस ऑफ गॉड

कृष्णाच्या जीवनाच्या शेवटच्या दिवशी घडणारी ही कथा आहे. कुरुक्षेत्रावरची धूळ शांत झाली आहे आणि यादवांचाही विनाश झाला आहे जंगलाच्या मध्यभागी एकेकाळचे गौरवशाली भगवान एकटे बसले आहेत आणि आपली शेवटची घटका मोजत आहेत. तिथे स्वर्गीय वैभव नाही मात्र स्वतःच्या निवडींच्या प्रतिध्वनींना ते

प्रतिसाद देत आहेत. 

दिग्दर्शक: सुमन सहा

भाषा: बंगाली, संस्कृत (इंग्रजी सब टायटल्स सहित)

कालावधी: ८२ मिनिटे 

कवन

वेगाने बदलणाऱ्या भारतात, या कथेचा नायक आणि त्याच्या सभोवतालचे लोक स्वप्ने, इच्छा आणि दुविधा यात गुंतले जात आहेत आणि त्याचवेळी जात आणि वर्गाच्या गुंतागुंतीच्या परिस्थितीशीही ते जुळवून घ्यायचा प्रयत्न करत आहेत. हे आंबेडकरवादी नाटक, संगीत, विनोद, व्यंग आणि सामूहिक कथाकथनाच्या कलात्मक पद्धतीद्वारे जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशातील वर्चस्ववादी व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर काम करत असलेल्या नागरिकांनां आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन करते. 

दिग्दर्शक: अभिषेक मुजुमदार

कालावधी: १५० मिनिटे

मेझोक

मेझोक हा एकमेकांशी विणलेल्या कथांचा संग्रह आहे, ज्याचे रूपांतर अशा एका कथेत होते, ज्यात इच्छा, आपण अनुभवत असलेल्या गुंतागुंतींच्या प्रणाली आणि एक बर्फाच्छादित पर्वत गुंतलेला असतो. आपण ज्या जगामध्ये सापडलो आहोत त्या जगाचे रूप समजून घेण्यासाठी एक प्रकारे चिथावणी म्हणून या कथांचे तपशील काम करतात. प्रणालींच्या या चक्रव्यूहातून मार्ग काढत आपली स्वप्ने आणि इच्छा आपल्यासोबत कशा घेऊन जाव्यात यासंबंधी हे नाटक आहे. 

लेखन- दिग्दर्शन : ज्योती डोग्रा 

भाषा: इंग्रजी, हिंदी, कन्नड, लडाखी, कालावधी: ९० मिनिटे

द लिजेंड ऑफ खसक

ओ. व्ही. विजयन यांच्या ‘द लिजेंड ऑफ खसक’ या प्रसिद्ध कादंबरीवर आधारलेला, तल्लीन करणारा हा नाट्यप्रयोग केरळमधील अशांत भूतकाळाने दबलेल्या एका दुर्गम गावात आलेल्या तरुणाचा प्रवास आहे. या गावातील एकल-शिक्षक शाळेत तो शिकवू लागतो तेव्हा त्या जागेच्या समृद्ध मिथकांमध्ये आणि भयावह दंतकथांच्या जगात तो ओढला जातो. वास्तव आणि काल्पनिक जग यामधील रेषा विरघळू लागतात आणि आपल्याबरोबर प्रेक्षकांनाही त्या तात्विक आत्मनिरीक्षणाच्या क्षेत्रात घेऊन जातात. 

कालावधी: २०० मिनिटे 

भाषा: मल्याळम

(इंग्रजी सबटायटल्स सहित)

बोलविता धनी 

ही कथा मराठी रंगभूमीच्या एका वेगळ्या परंतु विशिष्ट काळी महत्त्वाच्या असलेल्या एका पैलूभोवती फिरते- तो पैलू म्हणजे प्रोम्टिंगची कला. ही कथा एका मेहनती प्रॉम्प्टरवर आधारित आहे, ज्याने ‘संगीत शारदा’ या नाटकाच्या यशात एक महत्त्वाची भूमिका बजावली होती. हे नाटक रंगमंचावर सादर होत असताना प्रॉम्प्टरला द्याव्या लागणाऱ्या परीक्षा आणि त्यांच्या क्लेशांचे दर्शन घडते. 

दिग्दर्शन: ऋषिकेश जोशी

भाषा: मराठी , कालावधी 150 मिनिटे

Serendipity Festival Plays
Serendipity Festival: 15 नाट्यप्रयोग, 17 मैफिली, कार्यशाळा! सेरेंडीपिटीचा गाजवाजा सुरू

ओत्ताम: बॉर्न टू रन 

हे नाटक ग्रामीण तामिळनाडूतील एका पेरियर कुटुंबातील मुलगी, अकाई अमरण हिच्या जीवनाची कहाणी आहे. जात आणि वर्गाच्या अडथळ्यांची झुंजून ही मुलगी 800 मीटर धावपटू म्हणून भारतातील आघाडीच्या ट्रॅक आणि फिल्ड खेळाडूंपैकी एक बनली आहे. मात्र तिला जेव्हा लिंगचाचणी करण्यास सांगितले जाते तेव्हा ती त्यात अपयशी ठरते आणि स्वतः कष्टाने निर्माण केलेले तिचे जग कोसळते. 

लेखक-दिग्दर्शक: सपन सरण

कालावधी 120 मिनिटे , भाषा: हिंदी, इंग्रजी आणि तामिळ 

Serendipity Festival Plays
Serendipity Festival: नृत्य, नाट्य आणि संगीत आणि दृश्यकलांचा उत्सव! वेध सेरेंडीपिटीचे..

बॉब मार्ली फ्रॉम कोडीहळ्ळी

दिग्गज जमैकन रेगे गायक बॉब मार्ली यांच्या गीतांमधून प्रेरित होऊन शहरी भारतातील उदारमतवादी पण बहिष्कृत जागांमधून प्रवास करणाऱ्या दलित तरुणांच्या जटील वास्तवाचा शोध हे नाटक घेते. ब्रेख्तियन शैली आणि कन्नड संगीत यांचे अनोखे मिश्रण असलेले हे नाटक जातीने ग्रस्त असलेल्या समाजातील व्यक्तींच्या ओळखीचे राजकारण आणि ओझे तपासते 

लेखक-दिग्दर्शक: लक्ष्मण के. पी. 

भाषा: कन्नड (इंग्रजी सब टायटल्स सहित) ,

कालावधी: 105 मिनिटे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com