Goa Accident  Dainik Gomantak
गोवा

Car Accident Goa: ओव्हरटेक करणाऱ्या कारची दुचाकीला धडक, ज्येष्ठ नागरीकाचा मृत्यू

रविवारी बाळ्ळी येथे कार आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.

Pramod Yadav

Car Accident Goa: गोव्यात शनिवारी आणि रविवारी दोन दिवसांत पाच अपघातांची नोंद झाली आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून, राज्याला लागलेले अपघाताचे ग्रहण कधी सुटणार हा प्रश्न कायम आहे.

रविवारी बाळ्ळी येथे कार आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाळ्ळी येथे भरधाव कारने ओव्हटेक करण्याच्या नादात दुचाकीला धडक दिली. या धडकेत सांतान फर्नांडिस (वय 64, रा. बाळ्ळी) यांना गंभीर दुखापत झाली.

दरम्यान, उपचारासाठी त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान, फर्नांडिस यांचा मृत्यू झाला आहे. अपघातप्रकरणी पोलिसांनी कार चालक रूचिता कुमार यांना अटक केली आहे.

दरम्यान, शनिवारी मिरामार येथे कारचा अपघात, बोरीत LPG सिलिंडर वाहतूक करणारा ट्रक उलटला आहे.

मिरामार बीचजवळ वीज खांबाला भरधाव कारने धडक दिली आहे. अपघातात कारच्या समोरच्या भागाचे नुकसान झाले असून, कार चालकाला किरकोळ दुखापत झालीय. 

बोरी येथे LPG सिलिंडर वाहतूक करणारा ट्रक उलटला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला असल्याचे स्थानिकांनी सांगितले. अपघातात ट्रक चालक उपेंद्र कुमार (वय 35) जखमी झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

''वैभव सूर्यवंशी-अभिषेक शर्मा जोडी टीम इंडियाचे लॉन्ग टर्म ओपनर असू शकत नाहीत...'' माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Prison Gang War: जेलमध्ये 'हिंसेचा तांडव'! कैद्यांच्या हल्ल्यात 4 सुरक्षा रक्षकांसह 23 जणांचा मृत्यू; ड्रग्ज कनेक्शन आले समोर

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच! एनआयएने बनवले मुख्य आरोपी; विशेष न्यायालयात चार्जशीट दाखल

IND vs ENG: Playing XI मध्ये मोठा ट्विस्ट! 'या' स्टार खेळाडूला बसावं लागणार बाकावर? इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 साठी टीम इंडियाचा मोठा निर्णय

"आम्हाला भारतात यायचंय!" POK च्या नेत्यांनी मोदी सरकारकडे मागितली मदत, एलओसी उघडण्याची केली मागणी; पाकड्यांना झटका

SCROLL FOR NEXT