Goa Accident: गोव्यातील अपघातांचे सत्र अद्याप सुरूच असून, वेगवेगळ्या ठिकाणावरून आज (रविवारी) देखील दोन अपघातांच्या घटना समोर आल्या आहेत.
शनिवारी दाबोळी येथील मुख्य सिग्नलसमोर एका सिमेंट कॉंक्रिटवाहू ट्रकने सायकलस्वाराला धडक दिल्याने, त्याचा जागीच मृत्यू झाला. तर, राजधानी पणजी येथील हिरा पेट्रोल पंपाजवळ पहाटे कारच्या धडकेत मनोज श्रीधरन हा पादचारी जागीच ठार झाला.
दरम्यान, रविवारी मिरामार येथे कारचा अपघात, बोरीत LPG सिलिंडर वाहतूक करणारा ट्रक उलटला आहे.
मिरामार येथे वीज खांबाला धडकली कार
मिरामार बीचजवळ वीज खांबाला भरधाव कारने धडक दिली आहे. अपघातात कारच्या समोरच्या भागाचे नुकसान झाले असून, कार चालकाला किरकोळ दुखापत झालीय. कारच्या धडकेमुळे वीज खांबावरील लॅम्प देखील तुटून खाली पडला आहे. आज पहाटेच्या वेळी हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
बोरीत LPG सिलिंडर वाहतूक करणारा ट्रक उलटला
बोरी येथे LPG सिलिंडर वाहतूक करणारा ट्रक उलटला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला असल्याचे स्थानिकांनी सांगितले. अपघातात ट्रक चालक उपेंद्र कुमार (वय 35) जखमी झाला आहे.
शनिवारी दोन अपघातात दोघांचा मृत्यू
शनिवारी (ता.8) सायंकाळी 5.45 वाजता दाबोळी राष्ट्रीय महामार्गावरील मुख्य सिग्नलजवळ सिमेंट कॉंक्रिटवाहू ट्रकची (जीए07- एफ-7155) जोरदार धडक बसल्याने सायकलस्वार खर्क प्रसाद भरदु जैशी (वय 44वर्षे, मूळ रा. महाराष्ट्र) याचा अपघातात जागीच मृत्यू झाला.
तर, पणजीत हिट ॲण्ड रन केसमध्ये हिरा पेट्रोल पंपाजवळ काल पहाटे कारच्या धडकेत मनोज श्रीधरन हा पादचारी जागीच ठार झाला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.