Francis Sardin  Dainik Gomantak
गोवा

MP Francis Sardin: मला पाचव्‍यांदा लोकसभेत पाठवा

MP Francis Sardin : उमेदवार निवडताना पक्षाने प्रत्‍येक गोष्‍ट लक्षात घ्‍यावी

दैनिक गोमन्तक

MP Francis Sardin: मतदारांनी माझ्‍यावर विश्‍‍वास ठेवून चारवेळा मला लोकसभेत पाठविले आहे. आता पाचव्या वेळीही त्‍यांनी मला मोठ्या संख्‍येने मतदान करून लोकसभेत पाठवावे, असे आवाहन दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्‍सिस सार्दिन यांनी केले.

नाताळच्या एक दिवस अगोदर त्‍यांनी कुडतरी येथील आपल्या निवासस्थानी खासदार निधीतून विकलांग व्यक्तींना तीनचाकी प्रदान करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्‍यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्‍येने उपस्‍थित होते.

काँग्रेस पक्षातून निवडणूक लढविण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत व याची मला जाणीवही आहे. पण पक्षाने उमेदवारी देताना काही गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. चारही वेळा लोकसभेत मी लोकांचे प्रश्‍‍न व त्यांच्या समस्या योग्‍य पद्धतीने व परिणामकारकरित्या मांडलेल्या आहेत. काही समस्या सुटल्याही आहेत. लोकांना विश्‍‍वासात घेऊनच मी मार्गक्रमण करत आहे, असे सार्दिन यांनी सांगितले.

यावेळी सार्दिन यांनी भाजपच्‍या कारभारावर सडकून टीका केली. ते म्‍हणाले, झुआरी पुलाचा प्रस्ताव मी मांडला होता, पण आता श्रेय मात्र भाजपचे नेते घेत आहेत.

सार्दिन यांच्‍या घोषणेबाबत आश्‍चर्य

याप्रसंगी उपस्‍थित असलेल्यांमध्ये निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले कॅप्टन विरियातो फर्नांडिस, एम. के. शेख, मोरेनो रिबेलो, मिशेल रेबेलो यांचा समावेश होता. फ्रान्‍सिस सार्दिन यांच्‍या यांच्या आवाहनाला या सर्वांनी होकार दिला. मात्र काँग्रेसतर्फे निवडणूक लढविण्यास गिरीश चोडणकर, एल्विस गोम्स आदी नेते इच्छुक असताना व पक्षाने अजून काहीही निर्णय घेतला नसताना सार्दिन यांनी स्वत:ला उमेदवार घोषित केल्याचे काहींनी आश्‍चर्य व्‍यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT