zp Election Dainik Gomantak
गोवा

ZP Election: दवर्ली, कुठ्ठाळीत कलम 144 लागू

दक्षिण गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी आदेश केले लागु

दैनिक गोमन्तक

रविवारी दवर्ली, कुठ्ठाळी येथे होणाऱ्या जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण गोव्याचे जिल्हा दंडाधिकारी ज्योती कुमारी यांनी आज कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. त्यामूळे मतदान केंद्रे तसेच परिसरातील सर्व रेस्टॉरंट्स, बार, चहाची दुकाने यांना मर्यादा पाळत आपले व्यवसाय सुरु ठेवता येणार आहेत. हे आदेश मतदान आणि मतमोजणी या दिवशी लागु असणार आहेत.

(Section 144 imposed in Davorlim, Cortalim for zilla panchayat bypolls)

दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, दवर्ली आणि कुठ्ठाळी जिल्हा पंचायत मतदारसंघातील मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरात असलेली सर्व रेस्टॉरंट्स, बार, चहाची दुकाने, पान दुकाने, भोजनालये आणि इतर खाद्यपदार्थांची दुकाने मतदानाच्या दिवशी म्हणजे 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 ते 6 या वेळेत बंद राहतील.

5 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास बंदी

संध्याकाळी 6 वा. मतमोजणी केंद्राच्या 200 मीटर परिसरात असलेल्या अशा सर्व युनिट्सनाही मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच 18 ऑक्टोबर रोजी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दोन्ही जिल्हा पंचायत मतदारसंघांच्या हद्दीतील मतदान केंद्रांच्या 200 मीटरच्या आत 5 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास किंवा गर्दी करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT