Goa First: वास्को येथील बेकायदेशीर बीफ दुकानाविरुद्ध 'गोवा फर्स्टची' तक्रार

वास्को येथे स्वच्छतागृहे, स्तनपानाची जागा किती ?
Goa First
Goa FirstDainik Gomantak

वास्को: मुरगाव मुख्याधिकारी, उपजिल्हाधिकारी यांच्याकडे स्वच्छतागृह उपलब्ध नसल्याबद्दल दुकानदार आणि सामान्य नागरिकांच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर, गोवा फर्स्ट या बिगर सरकारी संस्थेने, वास्को येथील एका बेकायदेशीर बीफ दुकानाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

('Goa First' complaint against an illegal beef shop at Vasco )

Goa First
Chapora: शापोरा येथील बेकायदेशीर गाळे हटवले

वास्को येथील मुरगाव पालिका मार्केट कॉम्प्लेक्समध्ये स्वच्छतागृहाची सुविधा नसल्याने सामान्य जनता आणि दुकानदारांची तक्रार गोवा फर्स्टचे समन्वयक परशुराम सोनुर्लेकर यांनी मुरगाव पालिकेकडे माहिती हक्क कायद्याअंतर्गत केली होती. यामध्ये वास्को येथे स्वच्छतागृहे, स्तनपानाची जागा किती आहे? याची माहिती मागितली होती.

Goa First
Ravi Naik : ...तर गोव्यातल्या बारमालकांचं दिवाळं निघेल

याबाबत माहिती पालिकेने देताना अशा कोणत्याही सुविधा पालिका मार्केटमध्ये नसल्याचे सांगितले. तसेच असेही सांगितले की सुलभ शौचालय दुकानदार आणि सामान्य लोकांसाठी आहे. यानंतर गोवा फर्स्टने अस्तित्वात असलेल्या टॉयलेटच्या विरोधात आणखी एक आरटीआय भरला होता.

दाखल केलेल्या आरटीआयमध्ये असे दिसून आले की, अस्तित्वात असलेले टॉयलेट मुरगाव पालिकेने लीजाऊट केले आहे. आणि नागरी आरोग्याने दिलेले ना हरकत प्रमाणपत्र 2006 मध्ये वास्को पालिका मार्केट ट्रेड परवाना T/o/3430 येथील बेकायदेशीर बीफ शॉपचे मालक तोफिक बेपारी यांना दिला असल्याचे उघड झाले आहे.

गोवा फर्स्टने याविषयी यापूर्वीही तक्रार दाखल केली होती. आता माहिती हक्क कायद्याअंतर्गत माहिती मिळवून तोफिक जी बेपारी याला गोमांस विक्री करण्यासाठी दिलेल्या ट्रेड लायसन्स रद्द करण्यास सांगितले आहे. तसेच सदर जागा सामान्य लोक आणि दुकानदाराच्या वापरासाठी शौचालय पुन्हा मूळ स्थितीत स्थापित करण्याची मागणी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com