Goa Assembly Winter Session Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Winter Session: अधिवेशन काळात जमाबवंदीचे आदेश; पाच लोकांना एकत्र येण्यास बंदी

अधिवेशन काळात पाच व पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आली आहे.

Pramod Yadav

गोवा विधानसभेचे अधिवेशन येत्या 16 जानेवारीपासून होणार आहे. अधिवेशन काळात मोर्चे निघण्याची शक्यता असल्याने उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामु हगे यांनी कलम 144 (1) अंतर्गत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार, पाच व पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच, घोषणा देणे, स्पिकर लावण्यास, बंदी, लाग लावून निषेध करण्यास तसेच, लाठी, तलवार, चाकू अशी घातक हत्यारे जवळ बाळगण्यास बंदी घातली आहे.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशात काय म्हटले आहे?

गोवा विधानसभेचे हिवाळी अधिवेशन येत्या 16 जानेवारीपासून सुरू होणार आहे. यावेळी विधानसभेत म्हादई, पीएसआय घोटाळा, पिळर्ण आगीची घटना यासारखे विषय गाजण्याची शक्यता आहे. यावरून लोकांचे मोर्चे देखील निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी, सामान्य नागरिकांना त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अधिवेशन काळात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.

कशावर बंदी

- पाच व पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास किंवा सभा घेण्यास बंदी

- लाठी, तलवार, चाकू किंवा धारदार वस्तू जवळ बाळगण्यास बंदी

- स्पिकर लावण्यास तसेच, घोषणा देण्यास बंदी

- आग लावण्यास बंदी

वरील कोणतीही गोष्ट कोणत्याही ठिकाणी, रस्ता, चौकात किंवा मोकळ्या जागेत तसेच, विधानसभेच्या पाचशे मीटर परिसरात आणि पणजी परिसरात करण्यास बंदी घातली आहे. 16 जानेवारी सकाळी दहा वाजल्यापासून हे आदेश लागू होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

Ranji Trophy Cricket: घरच्या मैदानावर गोव्याची रणजी मोहीम सुरू; अनुभवी बडोद्याशी पहिल्यांदाच रणजी लढत

SCROLL FOR NEXT