Anjuna Assault Case: मुंबईतील 'त्या' एसी टेक्निशियनचा मृत्यू, बिहारी संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल

हणजूण पोलिसांनी पाचही मुळे बिहारचे असलेल्या संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
Anjuna Assault Case
Anjuna Assault CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Anjuna Assault Case: हणजूण येथे दारूच्या नशेत दोघा एसी टेक्निशियनवर हल्ला करून त्यांना गंभीर मारहाण करण्यात आली. यामध्ये मुंबई येथील व्यक्ती गंभीर जखमी झाली होती.

दरम्यान, या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. वासीम शेख (वडाळा-मुंबई) असे या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, हणजूण पोलिसांनी पाचही मुळे बिहारचे असलेल्या संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. हणजूण पोलिसांनी रात्रीच त्यांना अटक केली आहे.

Anjuna Assault Case
Anjuna Crime: हणजुणात दोघांवर खुनी हल्ला, 5 बिहारींना अटक

दीपक पासवान, रोशन पासवान, दीक्षांत पासवान, किशन पासवान आणि सुमित कुमार शाह अशी या आरोपींची नावे आहेत. हे पाचही कामगार मूळचे भितसरी, बेगुसराय बिहार येथील रहिवासी आहेत.  

Anjuna Assault Case
Pilerne Berger Fire: पिळर्णच्या 2km परिघातील नागरिकांसाठी Advisory जाहीर, मदतीसाठी यांना संपर्क साधा

वासिम हे मुळचे मुंबईचे आहेत. तक्रारीनुसार सोहेल आणि वासिम हे दोघेही एका बांधकाम साईटजवळ थांबले होते. तेव्हा दारूच्या नशेत असलेल्या या पाचही बिहारी कामगारांनी त्यांच्याजवळ येऊन उगाचच भांडण काढले. आणि थेट हल्लाच चढवला. यात वासिम यांना बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करण्यात आली.

वासिम याला गंभीर दुखापत झाली व त्याला उपचारासाठी गोमॅकोमध्येमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान, सोहेल आणि वासिम एसी दुरूस्तीच्या कामासाठी गोव्यात आले होते. 9 जानेवारी रोजी रात्री हा प्रकार घडला आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Sexual Assault Case Khorlim Mapusa
Bombay high court goa bench
Crime Branch raid on fake call centre in Anjuna Goa
Custodial Assault Allegations
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com