Goa: पत्रादेवी चेकनाका
Goa: पत्रादेवी चेकनाका Dainik Gomantak
गोवा

'पत्रादेवी नाक्यावर हंगामी परमिट मिळावे'

दैनिक गोमन्तक

मोरजी: पेडणे तालुक्यातील टूर अँड ट्रॅव्हल व्यवसाय करणारी 200 हून अधिक वाहने पेडणे तालुक्यात आहेत. राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी त्या वाहनांसाठी हंगामी परमिट देण्याची सोय धारगळ चेकनाक्यावर पूर्वी वाहतूक खाते करत होते. तीच सोय आता पत्रादेवी येथील चेकनाक्यावर करावी, अशी मागणी व्यावसायिक सिद्धेश धारगळकर आणि सुदीप शेट्ये यांनी केली आहे.

सुदीप शेट्ये म्हणाले,की एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी एखाद्या वेळी अचानक कुणीतरी भाडेकरू येतो आणि भाडे ठरवत असतो. तेव्हा पूर्वी धारगळ येथे चेक नाक्यावर परमिट साठी गेलात तर त्या ठिकाणी ते परमिट मिळत असे. परंतु धारगळचा नाका बंद करून तो पत्रादेवी येथे स्थलांतरीत केलेला आहे.

परंतु पत्रादेवी चेक नाक्यावर परमिट देण्याची सोय नसल्याने तेथील अधिकारी पेडणे वाहतूक कार्यालयात पाठवतत. परंतु पेडणे वाहतूक कार्यालय हे शनिवार, रविवारी बंद असते. अचानक एखाद्यावेळी रविवारी जर भाडे आले तर परमिट नसल्यामुळे ते स्वीकारता येत नाही. परंतु परस्पर महाराष्ट्रातील काही वाहने येऊन राज्यातील भाडे इतरत्र घेऊन जातात. त्यामुळे आमच्या व्यवसायावर संकट ओढवल्याचे सुदीप शेट्ये यांनी सांगितले.

कधी तरी एखादे भाडे मिळाले आणि ते भाडे घेताना आपल्याकडे परमिट नसेल तर ते भाडे सोडावे लागते. परंतु महाराष्ट्रातील काही खासगी टेम्पो ट्रॅव्हल्स वाहने थेट पेडणे तालुक्यात येतात आणि आमचे भाडे घेऊन जातात. त्या वाहनांना खासगी वाहनांना केवळ दहा ते बारा हजार रुपयांचा विमा भरावा लागतो. परंतु कायदेशीर टूर अँड ट्रॅव्हल व्यवसाय करणाऱ्यांना वर्षाकाठी पन्नास ते साठ हजार रुपये विमा हप्त्यापोटी भरावे लागतात,असे शेट्ये म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mormugoa Port: खवळलेल्या समुद्रात बोटीचे इंधन संपले; मुरगावजवळ 24 पर्यटक आणि 2 क्रू सदस्यांना जीवदान

Goa Today's Live News: कोकण रेल्वेचे करमळी येथे लेक व्ह्यू रेस्टॉरंट; मडगावात रेंट बाईक सुविधा

Panaji Corporation : खोदकामांमुळे दोन महिन्‍यांपासून खावी लागतेय धूळ; रायबंदरवासीयांच्‍या नशिबी ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’

Goa HSC CBSE Result 2024: अनिश कांबळी राज्यात अव्वल; बारावी परिक्षेत मिळवले ९८.२० टक्के गुण

Smart City Road : सांतिनेजमधील अर्धा टप्पा अपूर्ण; खरे आव्‍हान पावसाचे आणि रस्‍ते खचण्‍याचे

SCROLL FOR NEXT