Schools Close on Saturday Dainik Gomantak
गोवा

Schools Close on Saturday: गोव्यातील शाळा, महाविद्यालये शनिवारी राहणार बंद; 'हे' आहे कारण...

शिक्षण संचलनालयाचा निर्णय; विद्यार्थी-पालकांना दिलासा

गोमंतक ऑनलाईन टीम

Schools Close on Saturday: गोव्यातील सर्व सरकारी शाळा, महाविद्यालये शनिवारी, १० जून रोजी बंद राहतील. तशा पद्धतीचे आदेश शिक्षण संचलनालयाने काढले आहेत. वातावरणातील बदलांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

गोव्यात सध्या असह्य आणि मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत आहे. तसेच मॉन्सूनच्या पावसाचे आगमनही काही दिवस लांबणीवर पडले आहे. त्यामुळे पालकांमधुनही शाळा बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात येत होते.

आता शिक्षण संचलनालयाने घेतलेल्या या निर्णयाने विद्यार्थी-पालकांना दिलासा मिळाला आहे.

सर्व सरकारी शाळा, सरकारी अनुदानित, विना अनुदानित शाळा, प्राथमिक, माध्यमिक शाळा, विशेष शाळा आणि ज्युनियर कॉलेज शनिवारी बंद राहतील. या संस्थांच्या प्रमुखांना तसे आदेश देण्यात आले आहेत.

सर्व शिक्षण संस्थांनी या भविष्यात या सुट्टीच्या दिवसाची भरपाई करावी, असेही आदेशात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT