CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak

CM Pramod Sawant: सांकवाळ येथील युनिव्हर्सिटी ऑफ लीगल एज्युकेशनला धारबांदोड्यात जमिन; मुख्यमंत्र्यांची घोषणा

स्थलांतरीत झाल्यावर सध्याच्या इमारतीचे कला भवन करणार
Published on

CM Pramod Sawant: सांकवाळ येथील युनिव्हर्सिटी ऑफ लीगल एज्युकेशन अँड रिसर्च या संस्थेला धारबांदोडा तालुक्यात जागा देण्यात आली आहे. विद्यापीठाचा संपुर्ण कॅम्पस तिकडे स्थलांतरित झाल्यावर या इमारतीला कला भवन म्हणून विकास करणार, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

CM Pramod Sawant
Electric Two Wheelers in Goa: गोव्यात ई-दुचाकींचा टक्का वाढला; एकूण दुचाकींपैकी 15 टक्क्यांहून अधिक इलेक्ट्रिक

गोव्यातील इंडिया इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ लीगल एज्युकेशन अँड रिसर्च या संस्थेच्या पहिल्या स्थापना दिन सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाची सुरवात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी या विद्यापीठाला धारबांदोडा तालुक्यात जमिन दिली असल्याचे स्पष्ट केले. तसेच एकदा तिकडे विद्यापीठाचा हा सर्व कॅम्पस स्थलांतरित झाल्यावर सध्याची इमारत कला भवन म्हणून वापरली जाईल, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com