Goa School Books Availability  Canva
गोवा

Goa Education: शालेय पुस्तके वेळेवर उपलब्ध होणार! संचालकांनी दिली खात्री; जुनी की नवीन यावरून पालक, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

Goa School Books Update: यंदा शालेय वर्ष १ एप्रिलपासून सुरू होत आहे, त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये पुस्तकांच्या उपलब्धतेबद्दल चिंता होती.

गोमन्तक डिजिटल टीम

School Books Availability In Goa

सासष्टी: यंदा शालेय वर्ष १ एप्रिलपासून सुरू होत आहे, त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये पुस्तकांच्या उपलब्धतेबद्दल चिंता होती. यासंदर्भात शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितले की, सर्व शालेय पुस्तके वेळेवर उपलब्ध होतील, घाबरण्याचे कारण नाही.

झिंगडे यांनी पुढे सांगितले की, यंदा सहावीच्या पुस्तकांमध्ये थोडा बदल अपेक्षित आहे; पण ही पुस्तके १ एप्रिलपर्यंत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरु आहे. शिवाय आता शाळांना पूर्वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांकडून पुस्तके घेऊन ती पुढील वर्गाच्या विद्यार्थ्यांना देण्यास कळविले आहे व ही पद्धती गतसालापासून सुरू आहे.

एरव्ही जूनमध्ये सर्व पुस्तके उपलब्ध होत होती. आता इंटरनेटवर ई-पुस्तके उपलब्ध आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.

आम्ही पुस्तके छापायला दिली आहेत. मात्र, कागदाच्या टंचाईमुळे कदाचित थोडा विलंब होण्याची शक्यता टाळता येणार नाही.

दरम्यान, ‘एमबीडी’चे पुजारी यांनी सांगितले की, आमच्याकडे नववी ते बारावीपर्यंतची सर्व पुस्तके उपलब्ध आहेत. सरकारने आणखी प्रती छपाईची ऑर्डर दिली आहे. त्यामुळे पुस्तकांची कमतरता भासण्याचा प्रश्र्नच येत नाही. तसेच काही विद्यार्थ्यांनी, पालकांनी व पुस्तक विक्रेत्यांनी पुस्तक उपलब्धततेवर शंका व्यक्त केली.

पालक, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

नव्या शैक्षणिक धोरणानुसार नवीन पुस्तके तयार केली जातील, असे मुख्यमंत्री तथा शिक्षणमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले होते. त्यामुळे ही नवीन पुस्तके वेळेवर तयार होतील की नाही याबद्दल संबंधितांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. यंदापासून जुनी की नवीन पुस्तके लागू होतील याबद्दलही पालक व विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

नववी ते बारावीपर्यंतच्या पुस्तकांची छपाई करून गोवा शालान्त मंडळाला पुरवठा करणारी होली फेथ इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पुस्तक विक्रेत्यांना जुन्याच पुस्तकांचा साठा उपलब्ध करीत असल्याचे काही पुस्तक विक्रेत्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रावळपिंडी एक्सप्रेसचं स्लिप ऑफ टंग! अख्तरच्या तोंडून अभिषेक शर्माऐवजी अभिषेक बच्चनचं नाव, त्याने पोस्ट करत दिली प्रतिक्रिया Watch Video

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

SCROLL FOR NEXT