Save Mahadayi Virdi Protest Dainik Gomantak
गोवा

Watch Video: विर्डीच्या सभेसाठी लोकांना पैसे देऊन आणले का? पाहा काय म्हणाले साखळी पालिकेचे नगरसेवक

विर्डी येथील या सभेसाठी परप्रांतियांना पैसे देऊन गोळा केल्याचा आरोप केला जात आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

विर्डी येथे समस्त गोमंतकीयांचे लक्ष लागून राहिलेली 'सेव्ह म्हादई मंच'ची सभा पार पडली. यात अनेक पर्यावरणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, विद्यमान आमदार आणि मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली.

तीन ते साडे तीन तास सुरू असेल्या सभेत विविध मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सर्वांनी म्हादईसाठी सर्वांनी एकत्र येण्याची तसेच, या विषयात राजकारण न करण्याची विनंती केली. तसेच, गोव्याची अस्मिता जपण्यासाठी ही लढाई आपल्याला जिंकायलाच हवी असे आवाहन देखील मान्यवरांनी उपस्थितांना केले.

विर्डी येथील या सभेसाठी परप्रांतियांना पैसे देऊन गोळा केल्याचा आरोप केला जात आहे. याबाबत थेट प्रश्न आम्ही साखळी पालिकेचे ‘टुगेदर फॉर साखळी’ गटाचे नगरसेवक राजेश सावळ यांना विचारला. सावळ यांनी या आरोपाचे खंडन करत लोकांना पैसे देऊन आणले नसल्याचे त्यांनी सांगितले.

पाहा काय म्हणाले नगरसेवक राजेश सावळ

दरम्यान, केंद्राने मंजूर केलेला कर्नाटकचा DPR पंधरा दिवसात मागे न घेतल्यास 'गोवा बंद'ची हाक द्या. तरीही DPR मागे न घेतल्यास राजीनामा द्या, त्यातूनही काही झाले नाही तर, सर्वच्या सर्व आमदार राजीनामा देऊ. याबाबत आम्ही तुमच्यासोबत आहोत. सर्व देशाला गोव्याची एकता दाखवून देऊ. आशा शब्दात गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर हल्लाबोल केला.

तसेच, कर्नाटकने बंदिस्त तसेच ओपन कॅनाल बांधले आहेत. यातून ते पाणी वळविण्यासाठी त्यांनी पूर्ण तयारी केली आहे. पण, गोवा सरकार म्हणते एक थेंब देखील पाणी कर्नाटकला देणार नाही. कसे देणार नाही असे तुम्ही म्हणता, काय तयारी केली आहे तुम्ही? असा सवाल पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांनी उपस्थित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hardik Pandya: हार्दिक पंड्या आणि मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? 'अनफॉलो' आणि पोस्ट डिलीट केल्याच्या चर्चेमागचं नेमकं सत्य काय?

Fake Call Center: पार्टी, नाईटलाईफच्या नादात तरुण बनले गुन्हेगार; गोव्यातील बनावट कॉल सेंटर्सचा पर्दाफाश, परराज्यातील 50 हून अधिक तरुण ताब्यात

Virat Kohli Golden Duck: किंग इज बॅक... पण शून्यावर! कोहलीकडून 4 वर्षांनंतर पुन्हा एकदा नकोशा विक्रमीची पुनरावृत्ती

Horoscope: सोमवारी 'या' राशींना लाभणार नशिबाची साथ; महादेवाच्या कृपेने मार्गी लागतील सर्व अडलेली कामे!

क्रिकेट विश्वात खळबळ! रोहित शर्मा पाकिस्तानचा कर्णधार? LIVE सामन्यात ब्रॉडकास्टरची मोठी चूक Watch Video

SCROLL FOR NEXT