Mormugao : अखेर आठवड्यानंतर खलाशाचा मृतदेह आढळला

किनारी पोलिस व इतरांनी मिळून समुद्रातील मृतदेह काढला बाहेर
Crime News
Crime NewsDainik Gomantak

Mormugao : मुरगाव पत्तन प्राधिकरणाच्या धक्का क्र 9 समुद्रात मालीम जेटीवरील मच्छिमार बोटीवरील कामगाराचा मृतदेह आढळला आहे. मुरगाव हार्बर किनारी पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मडगांव हॉस्पिसियो रुग्णालयात पाठवून दिला आहे.

Crime News
Save Mahadayi Virdi Protest: राजकारण नको, म्हादईसाठी एकत्र या; ही लढाई जिंकायलाच हवी

गेल्या आठवड्यात मालीम जेटीवरील मच्छिमार बोटीवर काम करणारा खलाशी मनोहर अमरॉन हा मासळी पकडण्यासाठी मच्छिमार बोटीवरून मासळी पकडताना समुद्रात पडला. तेव्हापासून मनोहर अमरॉन गायब असल्याची तक्रार मालीम जेटीवरील मासळी व्यवसायिकांनी पोलिसात दाखल केली होती.

सोमवार (दि.16) मुरगाव बंदरातील धक्का क्र: ९ वरील जेटीवर एका अज्ञाताचा मृतदेह आढळला. याप्रकरणी मुरगाव बंदरातील अधिकाऱ्यांनी मुरगाव हार्बर किनारी पोलिस स्थानकाला माहिती दिली. किनारी पोलिस व इतरांनी मिळून समुद्रातील मृतदेह बाहेर काढला.

Crime News
Porvorim : महिलांनो घराबाहेर पडताना काळजी घ्या; राज्यात सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट

नंतर मुरगाव हार्बर किनारी पोलिस निरीक्षक प्रदीप वेळीप यांनी अज्ञाताच्या मृतदेहाची सखोल चौकशी सुरू केली. गेल्या आठवड्यात मालीम जेटीवरील मच्छिमारीसाठी गेलेल्या मनोहर अमरॉन खलाशी मासळी पकडताना समुद्रात पडला होता.

याविषयी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. किनारी पोलिसांनी त्वरीत मालीम जेटीवर संपर्क साधला व तेथील मासळी पकडणाऱ्यांकडून मृतदेहाची ओळख पटवून घेतली. सदर मृतदेह मालीम जेटीवर काम करणारे मनोहर अमरॉन (झारखंड) यांचा असल्याची ओळख पटली. मुरगाव हार्बर किनारी पोलिस निरीक्षक प्रदीप वेळीप याप्रकरणी पुढील तपास करीत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com