Save Mahadayi Virdi Protest: राजकारण नको, म्हादईसाठी एकत्र या; ही लढाई जिंकायलाच हवी

म्हादई वाचवण्यासाठी साखळीत 'म्हादई बचाव' जनआंदोलन पार पडले.
Save Mahadayi Virdi Protest
Save Mahadayi Virdi ProtestDainik Gomantak

राजकारण नको, म्हादईसाठी एकत्र या... ही लढाई जिंकायलाच हवी

विर्डी येथे समस्त गोमंतकीयांचे लक्ष लागून राहिलेली 'सेव्ह म्हादई मंच'ची सभा पार पडली. यात अनेक पर्यावरणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, विद्यमान आमदार आणि मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली.

तीन ते साडे तीन तास सुरू असेल्या सभेत विविध मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सर्वांनी म्हादईसाठी सर्वांनी एकत्र येण्याची तसेच, या विषयात राजकारण न करण्याची विनंती केली. तसेच, गोव्याची अस्मिता जपण्यासाठी ही लढाई आपल्याला जिंकायलाच हवी असे आवाहन देखील मान्यवरांनी उपस्थितांना केले.

सभेसाठी सर्व आमदारांना निमंत्रण देण्यात आले होते मात्र, काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि आप वगळता इतर पक्षांनी या सभेकडे पाठ फिरवली.

म्हादईचे अजिबात राजकारण करू नका - पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांची कळकळीची विनंती

राजेंद्र केरकर
राजेंद्र केरकरDainik Gomantak

कर्नाटकने बंदिस्त तसेच ओपन कॅनाल बांधले आहेत. यातून ते पाणी वळविण्यासाठी त्यांनी पूर्ण तयारी केली आहे. पण, गोवा सरकार म्हणते एक थेंब देखील पाणी कर्नाटकला देणार नाही. कसे देणार नाही असे तुम्ही म्हणता, काय तयारी केली आहे तुम्ही? असा सवाल केरकर यांनी उपस्थित केला.

कर्नाटक आक्रमकपणे हा विषय मांडत असताना गोवा सरकार कानात बोळे घालून बसले आहे. असा आरोपही राजेंद्र केरकर यांनी केला. तसेच, म्हादईच्या विषयाचे अजिबात राजकारण करू नका अशी कळकळीची विनंती पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांनी केली. यावेळी उपस्थित आमदारांना देखील यासाठी एकत्रित येण्याची विनंती त्यांनी केली.

गोव्यात युनेस्कोची साईट नाही, उगाच कुणाला खोटी माहिती देऊ नका असेही केरकर यावेळी म्हणाले. आमची नदी वाचली, जीवसृष्टी वाचली तर आमचे जीवन समृद्ध होईल. असे त्यांनी नमूद केले.

पंधरा दिवसात DPR मागे न घेतल्यास, राजीनामा द्या - विजय सरदेसाई

केंद्राने मंजूर केलेला कर्नाटकचा DPR पंधरा दिवसात मागे न घेतल्यास 'गोवा बंद'ची हाक द्या. तरीही DPR मागे न घेतल्यास राजीनामा द्या, त्यातूनही काही झाले नाही तर, सर्वच्या सर्व आमदार राजीनामा देऊ. याबाबत आम्ही तुमच्यासोबत आहोत. सर्व देशाला गोव्याची एकता दाखवून देऊ.

आशा शब्दात गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर हल्लाबोल केला.

विजय सरदेसाई
विजय सरदेसाईDainik Gomantak

'भिवपाची गरज ना' म्हणारे मुख्यमंत्रीच घाबरले - ह्रदयनाथ शिरोडकर

'गोव्याचे लोक खाऊन-पिऊन सुशेगाद असतात, म्हादईसाठी कोणतेही आंदोलन होणार नाही. असे गृहमंत्री अमित शहा म्हणाले. पण, त्यांना हे माहिती नाही की गोव्याच्या लोकांनी 450 वर्षे राज्य करणाऱ्या पोर्तुगीजांना हकलून दिले होते. आजच्या म्हादई बचावच्या आंदोलनाला सर्व राजकीय पक्षांनी समर्थन दिले पण सत्ताधारी भाजने साथ दिली नाही. सारखे सारखे 'भिवपाची गरज ना' म्हणारे मुख्यमंत्रीच घाबरले आहेत.' असे ह्रदयनाथ शिरोडकर म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या साखळीत उसळला जनसागर

म्हादई बचावासाठी आज विर्डी येथे जनआंदोलन होत आहे. या सभेला सुमारे दहा हजार लोकांनी उपस्थिती लावली आहे. पर्यावरणवादी, समाज सेवकांनी आयोजित केलेल्या या सभेत राज्यातील विरोधी पक्ष देखील सहभागी झाले आहेत.

ज्येष्ठ साहित्यिक दामोदर मावजो

जनआंदोलनाच्या बैठकीत ज्येष्ठ साहित्यिक दामोदर मावजो यांनी उपस्थिती लावत म्हादईचे महत्व विशद कले. तसेच, म्हादईच्या बचावासाठी समस्त गोवेकरांना एकत्र येण्याचे आवाहन केले.

40 पैकी 06 आमदारांची उपस्थिती

म्हादई जनआंदोलनाच्या बैठकीत गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई, आपचे आमदार क्रुझ सिल्वा, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आपचे व्हेन्झी व्हिएगश, आणि काँग्रेसचे आमदार आल्टन डिकॉस्टा व कार्लुस फरेरा उपस्थित होते. या सभेसाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह इतर आमदरांना देखील आमंत्रण देण्यात आले होते.

जनआंदोलनाला गोवेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून लोकांनी म्हादई वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आले.

Mahadayi Bachao Protest
Mahadayi Bachao ProtestDainik Gomantak

'म्हादई'च्या जनआंदोलनात विरोधी पक्ष केवळ 'श्रोते' म्हणून उपस्थित राहणार

साखळीत होत असलेल्या म्हादई बचाव जनआंदोलनाच्या बैठकीत विरोधी पक्ष फक्त श्रोते म्हणून उपस्थित राहणार आहेत. गोवा प्रदेश काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने याबाबत ठराव केला आहे. त्यामुळे या पक्षांचे नेते व आमदार या बैठकीला उपस्थित राहिले तरी भाषण करणार नसल्याचे पक्षाने अधिकृतपणे सांगितले आहे.

म्हादईसाठी मी गोवेकरांच्या खांद्याला खांदा देत सोबत असेन : कीर्ती आझाद

'म्हादई बचाव' जनआंदोलनात प्रत्येक उपस्थितांचा आक्रोश दिसून येत आहे. प्रत्येकालाच म्हादईबाबत आपुलकी असून ती वाचावी म्हणून मोठ्या संख्येने लोकांनी हजेरी लावली आहे. यावेळी गोवा टीएमसी प्रभारी कीर्ती आझाद यांनी सरकारवर टीका करत आपला रोष व्यक्त केला.

ते म्हणाले, गोव्यातील नेते फक्त निवडणुकीत काम करण्याचा दिखावा करतात, मात्र दिलेली आश्वासने पूर्ण करत नाहीत. जर म्हादईचे पाणी वळवले तर होणाऱ्या आंदोलनात मी पहिली लाठी खायला देखील तयार असेन.

Street Play in Mahadayi Bachao Protest
Street Play in Mahadayi Bachao ProtestDainik Gomantak

'आमची म्हादय आमका जाय' म्हणत आंदोलनात शालेय विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करत जनजागृती केली.

'आमची म्हादय आमका जाय'; जनआंदोलनात गोवेकरांचा नारा

40 आमदारांसाठी जनआंदोलनात जागा राखीव 

साखळीत सुरू असलेल्या 'म्हादई बचाव' जनआंदोलनात गोव्यातील 40 आमदारांसाठी राखीव जागा ठेवण्यात आली आहे.

Reserved Place For MLA's in Mahadayi Bachao Protest
Reserved Place For MLA's in Mahadayi Bachao ProtestDainik Gomantak

'म्हादई बचाव' सभेला आमदार वीरेश बोरकर यांनी उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले असले तरीही त्यांच्या नावाची जागा राखीव ठेवण्यात आली आहे. आता खरंच ते या आंदोलनाला हजर राहणार की नाही, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Reserved Place For Viresh Borkar in Mahadayi Bachao Protest
Reserved Place For Viresh Borkar in Mahadayi Bachao ProtestDainik Gomantak
Mahadayi Bachao Protest
Mahadayi Bachao ProtestDainik Gomantak

गोव्‍याची तृषा भागविणाऱ्या म्‍हादईच्‍या अस्‍तित्‍वासाठी उभारलेल्‍या लढ्याला निर्णायक वळण मिळत आहे. साखळीतल्या जनआंदोलनाला अगदी लहान मुलांपासून वयोवृद्धांनी हजेरी लावली आहे.

Mahadayi Bachao Protest
Mahadayi Bachao Protest Dainik Gomantak

'म्हादई वाचवा' सभेला उपस्थित राहणार नाही : वीरेश बोरकर

म्हादई वाचवण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेचा एक भाग म्हणजे आज साखळीमध्ये रॅली निघणार आहे. साखळीतील आजच्या 'म्हादई वाचवा' सभेला उपस्थित न राहण्याचा निर्णय मी आणि माझ्या पक्षाने घेतला आहे, असे आमदार वीरेश बोरकर यांनी सांगितले.

Viresh Borkar
Viresh BorkarDainik Gomantak

साखळीत 'म्हादई बचाव' जनआंदोलनाला लोकांची गर्दी होत असून भर उन्हातही लोक आपली जीवनदायिनी असलेल्या म्हादईच्या बचावासाठी जमा झाले आहेत.

Mahadayi Bachao Protest
Mahadayi Bachao ProtestDainik Gomantak

साखळीत 'म्हादई बचाव' जनआंदोलन

म्हादई वाचवण्यासाठी साखळीत 'म्हादई बचाव' जनआंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी भव्य मैदान सज्ज करण्यात आले आहे.

Mahadayi Bachao Protest Live Updates
Mahadayi Bachao Protest Live UpdatesDainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com