Sattari SSC Result Dainik Gomantak
गोवा

Sattari SSC Result : सत्तरीतील सात सरकारी शाळांचे सुयश

Sattari SSC Result : त्यात ९ विशेष श्रेणीत, १० प्रथम श्रेणीत तर १४ द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाली. मुख्याध्यापक गोपीनाथ गावस व शिक्षकांनी यशवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Sattari SSC Result :

वाळपई, सत्तरी तालुक्‍यानेही दहावीच्‍या परीक्षेत उज्ज्‍वल यश संपादन केले आहे. एकूण सात सरकारी माध्यमिक विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला. तर, एका खासगी शाळेचा निकाल सलग सहा वेळा १०० टक्के निकाल लागला.

सत्तरीतून एकूण ६०५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यातील ५४८ उत्तीर्ण झाले. तालुक्‍याचा सरासरी एकूण ९०.५७ टक्के निकाल लागला.

गुळेली, अडवई, पिसुर्ले, मोर्ले, दाबे, सावर्डे, सुर्ला या सरकारी विद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला. त्यात केरी येथील विवेकानंद ज्ञानमंदिर विद्यालयाने सलग सहावेळा तर दाबे येथील सरकारी माध्यमिक विद्यालयाने सगल चारवेळा १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली. विवेकानंद ज्ञानमंदिर विद्यालयातून एकूण ३३ मुले परीक्षेला बसली होती.

त्यात ९ विशेष श्रेणीत, १० प्रथम श्रेणीत तर १४ द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाली. मुख्याध्यापक गोपीनाथ गावस व शिक्षकांनी यशवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. दरम्‍यान, आरोग्यमंत्री विश्‍‍वजीत राणे व आमदार डॉ. दिव्या राणे यांनीही दहावीत उत्तीर्ण झालेल्‍या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

Mahindra XUV 3XO CNG : महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT