Village Panchayat Mandrem Dainik Gomantak
गोवा

Mandrem: सरपंचपदाची माळ कोणाच्या गळ्यात? मांद्रेत ग्रामस्थांच्या चर्चेला उधाण

Mandrem Panchayat: फर्नांडिस यांना सरपंचपद मिळते की आमदार आरोलकर यांच्या समर्थकांच्या गळ्यात माळ पडते याविषयी ग्रामस्थांत उत्सुकता आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Mandrem Sarpanch

मोरजी: मांद्रे सरपंच पदी कोण?,याची सध्या मांद्रे पंचायत क्षेत्रात चर्चा सुरू झाली आहे. रोजा उर्फ मिंगेल फर्नांडिस यांना सरपंच पद मिळते की, आमदार जीत आरोलकर यांच्या समर्थकांच्या गळ्यात माळ पडते, याविषयी ग्रामस्थांत उत्सुकता आहे.

२०२२ साली महेश कोनाडकर यांची मांद्रे (Mandrem) सरपंच पदी निवड झाली. निवडीच्या २४ तासांच्या आत शपथविधीपूर्वीच त्यांच्यावर अविश्वास ठराव आला. परिणामी कोनाडकर यांना सरपंच पदावरून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर आमदार जीत आरोलकर समर्थक तसेच ॲड. अमित सावंत या सात जणांची एक बैठक रेडी येथील श्री गणपती मंदिरात झाली. तेव्हा अलिखित करार झाला. आधी ॲड. सावंत यांनी दोन वर्षे,नंतर इतर पंचांना सरपंच उपसरपंच अशी पदे विभागून देण्याचे ठरले होते.

रेडी गणेशासमोर करार

२०२२ साली मांद्रे पंचायत मंडळ रेडी येथील सुप्रसिद्ध गणेश मंदिरात वचन घेण्यासाठी गेले होते. त्यात ॲड. अमित सावंत, किरण सावंत, तारा हडफडकर, रोजा उर्फ मिंगेल फर्नांडिस व रोशाल फर्नांडिस यांचे पती आमरोज फर्नांडिस यांचा समावेश होता. तर चेतना पेडणेकर ,संपदा आजगावकर, महेश कोनाडकर. राजेश मांद्रेकर हे चार सदस्य सामील नव्हते. ॲड. अमित सावंत यांनीआपण सातवा सदस्य आणला तर त्याला सहा महिने सरपंचपद आपल्या कार्यकाळातील देऊ, असा रोजा यांना शब्द दिला. त्यानुसार रोजा सत्ताधारी गटात सामील झाले होते.

करार कोणी मोडला?

प्रशांत नाईक यांच्यावर भर चतुर्थीत रॉबर्ट फर्नांडिस यांनी पुढाकार घेऊन महेश कोनाडकर राजेश मांजरेकर, चेतना पेडणेकर या तिघांना घेऊन अविश्वास ठराव आणला. रेडी गणपती समोर ज्यावेळी सात पंच सदस्यांनी कार्यकाळ पूर्ण करण्यासाठी संघटित राहू,अशी प्रतिज्ञा केली. परंतु प्रशांत नाईक यांच्यावर अविश्वास ठराव आणून तो मंजूर झाला, त्यामुळे करार कोणी भंग केला, यावर चर्चा रंगली आहे.

मांद्रे पंचायतीचा सरपंच कोणी व्हावे, हे पंचायत सदस्यांनीच ठरवायचे असते. परंतु आपले समर्थक असलेले तारा हडफडकर,किरण सावंत ,रोशाल फर्नांडिस, रॉबर्ट फर्नांडिस या पंचायत सदस्यांनाही सरपंचपदाची संधी मिळायला हवी,असे आपल्याला वाटते. एकंदर पंचायत क्षेत्रात विकास व्हावा, यासाठी एकजूट राखून काम करण्याला प्राधान्य द्यायला हवे.
जीत आरोलकर, आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT