Mandrem Panchayat: अवघ्या पाच महिन्यांत मांद्रेच्या सरपंचाविरोधात अविश्वास ठराव; आमदारच पडद्यामागचे सूत्रधार?

Mandrem Sarpanch: मांद्रे सरपंच-आमदार आमने-सामने; ५ वर्षांसाठी असणारी ही पंचायत अल्पावधीतच दुसऱ्यांदा सरपंच बदलाच्या विळख्यात आहे
Mandrem Sarpanch: मांद्रे सरपंच-आमदार आमने-सामने; ५ वर्षांसाठी असणारी ही पंचायत अल्पावधीतच दुसऱ्यांदा सरपंच बदलाच्या विळख्यात आहे
Village Panchayat MandremDainik Gomantak
Published on
Updated on

Mandrem MLA Sarpanch Dispute

मोरजी: मांद्रे विधानसभा मतदारसंघातील मांद्रे ही प्रमुख पंचायत म्हणून ओळखली जाते. या पंचायतीवर ज्या आमदाराचे वर्चस्व, तोच आमदार मजबूत मनाला जातो. परंतु सध्या मांद्रे पंचायतीत खुर्चीसाठी चढाओढ सुरू आहे. ५ वर्षांसाठी असणारी ही पंचायत अल्पावधीतच दुसऱ्यांदा सरपंच बदलाच्या विळख्यात आहे. प्रशांत नाईक यांची सरपंचपदाची कारकीर्द फक्त जेमतेम ५ महिनेच चालली असून त्यांच्यावरील अविश्वास ठरावामागे आमदारांचा हात असल्याचे बोलले जात आहे.

माजी सरपंच ॲड. अमित सावंत यांचा कार्यकाळही वादातच गेला. मांद्रे पंचायत क्षेत्रातील विकास कामांच्या उदघाटनावेळी सरपंचांना वगळले होते. हा प्रकार एवढा गाजला की, मुख्यमंत्र्यांनाही याप्रकरणी भाष्य करावे लागले. अमित सावंत यांचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रशांत नाईक यांनी ५ महिन्यांपूर्वी पंचायतीचा कार्यभार हाती घेतला.

प्रशांत नाईक यांनी येथील शेतजमिनी व डोंगर, माळरानावरील जमिनींचे रूपांतरण रोखण्यासाठी पंचायतीतर्फे कठोर नियमांची अंमलबजावणीही केली. या जमिनींचे भूरूपांतर बंद करावे यासाठी सर्वप्रथम प्रशांत नाईक यांनी पुढाकार घेऊन टीसीपी खात्याने पंचायतीला विश्वासात घ्यावे व हा प्लॅनिंग झोन बंद करण्यासाठी भाग पाडले. ही कामे मार्गी लावत असताना दिवसरात्र एक करून सरपंच लोकांमध्ये प्रसिद्ध होत असल्याचे दिसून आले.

शेतकऱ्यांना मदतीचा हात

चतुर्थीपूर्वी सरपंच प्रशांत नाईक यांनी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या सुमारे ३५० शेतकऱ्यांना पंचायत मंडळातर्फे आर्थिक मदत दिली. सणासुदीच्या वेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. काही शेतकऱ्यांचे म्हणणे होते की, अशा प्रकारे मदत करणारे सरपंच प्रशांत नाईक हे मांद्रेतील व पेडण्यातील पहिलेच सरपंच आहेत. त्यांच्या या लोककार्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचे मनापासून आभार मानले.

Mandrem Sarpanch: मांद्रे सरपंच-आमदार आमने-सामने; ५ वर्षांसाठी असणारी ही पंचायत अल्पावधीतच दुसऱ्यांदा सरपंच बदलाच्या विळख्यात आहे
Mandrem Hill Cutting: 'मांद्रेतील डोंगरकापणी पर्रीकर यांच्या काळातील'; नगर नियोजन खात्याच्या नोटीसवर ढवळीकर स्पष्टच बोलले

लोकांची मर्जी राखल्याने अविश्‍वास ठराव

मला लोकांची एवढी पसंती लाभत असल्यानेच आमदारांनी हा अविश्वास ठराव लादल्याचे प्रशांत नाईक यांचे म्हणणे आहे. ऐन चतुर्थीच्या सणावेळी माझ्यावर हा अविश्वास ठराव लादल्याने माझ्यासाठी हा वाईट प्रसंग आल्याचे त्यांनी सांगितले. माझ्यासोबत असलेल्या दोन पंचांवर दबाव आणून आमदारांनी अविश्‍वास ठराव आणल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com