Ponda Crime News: गुरांच्या गोठ्यासाठी ना हरकत दाखला देण्यास टाळाटाळ करत असल्याच्या कारणावरून एकाने नागझर-कुर्टी येथील सरपंचासह पंचायत सदस्याला धक्काबुक्की आणि शिविगाळ केली.
हा प्रकार सोमवारी दुपारी घडला. याप्रकरणी फोंडा पोलिसांत गोपीनाथ नाईक याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
कुर्टी-खांडेपार पंचायतक्षेत्रातील नागझर भागात गोपीनाथ नाईक याचा गुरांचा गोठा आहे. ना हरकत दाखल्यासाठी गोपीनाथने पंचायत सचिवांकडे मागणी केली.
त्यावर सचिवाने त्याला नियमानुसार फाईल तयार करण्यास सांगितले. त्यानंतर सरपंच नावेद तहसीलदार यांनीही दाखल्यासाठी तीन वेगवेगळ्या फाईल्स तयार करून त्यात आवश्यक कागदपत्रे जोडण्यासंबंधी सांगितले.
मात्र, या ना त्या कारणाने आपल्याला रखडवले जात असल्याचा आरोप करत गोपीनाथने सरपंच, तहसीलदार, पंचसदस्य बाबू च्यारी यांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी उपनिरीक्षक आदित्य वेळीप पुढील तपास करीत आहेत.
"गोपीनाथ हे जनावरांचा गोठा दुरुस्तीसाठी ना हरकत दाखला घेण्यासाठी कार्यालयात आले होते. त्यावेळी त्यांना सर्व कागदपत्रे लावून फाईल्स देण्यास सांगितले."
"मात्र, ‘मला आजच ना हरकत दाखला पाहिजे’, असा आग्रह त्यांनी धरला. पंचायत कार्यालयात येताच ते सचिवांवर ओरडू लागले. तसेच मलाही शिविगाळ केली. "
- नावेद तहसीलदार, सरपंच, नागझर
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.