SantaCruz Murder Case Dainik Gomantak
गोवा

SantaCruz Gangwar: खुनाच्या आरोपाखाली पुरवणी आरोपपत्र दाखल

SantaCruz Gangwar: सांताक्रुझ येथे मध्यरात्रीच्या सुमारास दोन टोळींमध्ये गँगवार झाले होते.

दैनिक गोमन्तक

सांताक्रुझ येथील दोन गुन्हेगारी टोळींमधील गँगवॉरप्रकरणी जुने गोवे पोलिसांनी दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये खून व खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोप ठेवून न्यायालयात आरोपपत्रे सादर केली होती.

उच्च न्यायालयाने या प्रकरणी एकच गुन्हा दाखल करून त्यामध्ये पुरवणी आरोपपत्रात खुनाचा गुन्हा दाखल करण्यास मुभा दिली होती. त्यानुसार जुने गोवे पोलिसांनी 307 कलमाखाली दाखल केलेल्या आरोपपत्रासोबत काल खुनाच्या आरोपाखाली पुरवणी आरोपपत्र दाखल केले.

2020 मध्ये सांताक्रुझ येथे मध्यरात्रीच्या सुमारास दोन टोळींमध्ये गँगवार झाले होते. या गँगवॉरमध्ये सांताक्रुझ येथे एका टोळीकडून गोळीबार झाला होता. या घटनेवेळी गोळीबार सोनू यादव हा गोळी लागून मरण पावला होता. त्यामुळे जुने गोवे पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानुसार एकाच प्रकरणात दोन वेगवेगळ्या गुन्ह्याप्रकरणी दोन तक्रारी दाखल करता येत नाही मात्र आरोपपत्र सादर केल्यानंतर त्याला वेगळा गुन्हा दाखल करून पुरवणी आरोपपत्र सादर करता येते. या निवाड्याच्या आधारे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने एक तक्रार रद्दबातल ठरविली होती.

13 जणांविरोधात आरोपपत्र: या टोळीयुद्धावेळी पिस्तुलाची गोळी लागून मरण पावलेल्या सोनू यादव गटातील मार्सेलिन डायस व इतर 13 जणांविरोधात पोलिसांनी खुनाचा प्रयत्न तसेच जमावबंदी, घुसखोरी, कटकारस्थान या आरोपाखाली आरोपपत्र सादर केले होते. त्यानंतर पुरवणी आरोपपत्र खुनाच्या आरोपाखाली दाखल केले होते.

सत्र न्यायालयाने आरोप निश्‍चितेवेळी सर्वांविरुद्ध खुनाच्या आरोपाखाली आरोप ठेवले होते त्याला डायस याने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयातील सुनावणीवेळी सरकारी वकिलांनी दोनपैकी एक आरोपपत्र रद्द करण्यास सहमती दाखविली होती. त्यानुसार खंडपीठाने एक तक्रार रद्द करून नव्याने दोन्‍ही आरोपपत्रे विचारात घेऊन आरोप निश्‍चितीची सुनावणी घेण्याचे निर्देश दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT