वास्को: उमेश हरिजन (33) यांच्या हत्येप्रकरणी काल रविवारी अटक करण्यात आलेले तीन आरोपी जूम्मन शेख, परशुराम दोड्डामणी, दुर्गाप्पा मदार यांना सोमवारी वास्को पोलिसांनी न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग, वास्को यांच्यासमोर हजर केले असता त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
(Three suspects in Umesh Harijan murder case remanded 7 day police custody)
पूर्वी अटक केलेल्या दीपक सहानी आणि अमिर हूसैन या दोन आरोपींच्या पोलीस कोठडीत आणखी सात दिवसांनी वाढ करण्यात आली आहे. काटेबायणा येथे गेल्या सोमवारी भर दुपारी चौघांनी कोयता व चाकूने सपासप वार करून उमेश हरिजन (30, रा. हाऊसिंग कॉलनी, बायणा) या तरुणाची निर्घृण हत्या केली. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला. चार संशयितांपैकी दोघांना फोंडा पोलिसांनी पाठलाग करून पकडले आणि मुरगाव पोलिसांच्या ताब्यात दिले.
दीपक सहानी आणि अमिर अशी या संशयितांची नावे आहेत. आणखी तीन आरोपींचा शोध चालू होता. आरोपींना पकडण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी व कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले होते.या खून प्रकरणात पसार असलेल्या मृत उमेश हरीजन तीन संशयितांना रविवारी संध्याकाळी मुरगाव पोलिसांनी गोव्याबाहेरून गजाआड केले.
उमेश हरीजन याच्या हत्येनंतर पसार झालेल्यांपैकी अमीर हुसैन व दीपक सहानी या दोन संशयितांना फोंडा पोलिसांनी पाठलाग करून बाणस्तरी मार्गावरून गजाआड केले होते. तर जुम्मन, परशुराम ऊर्फ परश्या दोहुमणी आणि दुर्गाप्पा हे तिघे पसार झाले होते. त्यांना मुरगाव पोलिसांनी राज्याबाहेरून गजाआड केले. गेल्या सात दिवसांपासून त्यांचा शोध सुरू होता.
रविवारी पहाटे तिघांना घेतले ताब्यात
संशयित राज्याबाहेर एका ठिकाणी असल्याचे कळताच रविवारी पहाटे पथकाने तेथे जावून तिघांना ताब्यात घेतले. उमेश हा गेल्या सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास बायणातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात आला होता. तेथे श्रींचे दर्शन घेऊन महापूजेचा महाप्रसाद घेऊन निघाला होता. त्याच्यासोबत मित्र अशोक चलवादी होता. ते काटेबायणा येथील उड्डाणपुलाजवळ पोहोचले असता तेथे दबा धरून बसलेल्या पाच जणांनी त्यांना अडविले व उमेशला उड्डाण पुलाखाली नेले. तेथे त्याच्यावर कोयता आणि चाकूने हल्ला करण्यात आला.
या हल्ल्यात उमेश गंभीर जखमी झाला. हा प्रकार घडत असताना अशोकने उमेशच्या भावाला माहिती दिली. भाऊ विजय तेथे कार घेऊन येईपर्यंत हल्लेखोरांनी घटनास्थळाहून पळ काढला. उमेशला उपचारासाठी चिखली उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आले. परंतु तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.