Chief Minister Dr. Pramod Sawant
Chief Minister Dr. Pramod Sawant Gomantak Digital Team
गोवा

Sanquelim News : साखळी शहराला ‘रोल मॉडेल’ बनविणार - रश्मी देसाई

गोमन्तक डिजिटल टीम

साखळी : विकासाच्या दृष्टीने साखळी शहर राज्यात ‘रोल मॉडेल’ बनविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून साधनसुविधा विकासाबरोबरच मानवी विकासावरही लक्ष देणार आहे, असे मत साखळीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष रश्मी देसाई यांनी व्यक्त केले. साखळी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर रश्मी देसाई या पत्रकारांशी बोलत होत्या. नगराध्यक्षपदी निवडून आल्यानंतर रश्मी देसाई यांनी आपल्या कार्यालयाचा ताबा घेतला.

नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी रश्मी देसाई तर उपनगराध्यक्षपदी आनंद काणेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नगरपालिकेच्या कॉन्फरन्स सभागृहात सर्वप्रथम सर्व नगरसेवकांना शपथ देण्यात आली. त्यानंतर नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदांसाठी निवड प्रक्रिया हाती घेण्यात आली.

निवडणूक अधिकारी म्हणून उपस्थित उपजिल्हाधिकारी रोहन कासकर यांनी नगराध्यक्षपदी रश्मी देसाई तर उपनगराध्यक्ष आनंद काणेकर यांची निवड जाहीर केली. विरोधात एकही अर्ज आला नव्हता. पालिका मुख्याधिकारी कबीर शिरगावकर उपस्थित होते.

नगरपालिका सभागृहातील पदग्रहण सोहळ्यास नगरसेवक यशवंत माडकर, निकिता नाईक, सिद्धी प्रभू पोरोब, रश्मी देसाई, प्रवीण ब्लेगन, विनंती पार्सेकर, ब्रह्मानंद देसाई, रियाझ खान, आनंद काणेकर, दयानंद बोर्येकर, दीपा जल्मी व अंजना कामत यांची उपस्थिती होती.

विश्वास सार्थ ठरविणार!

उपनगराध्यक्षपदी निवड झालेल्या आनंद काणेकर म्हणाले, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व पक्षाने आपल्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरविणार आहे. साखळी बाजारात एक उत्तम व्यवस्था निर्माण करून बाजाराला वैभव प्राप्त करून दिले जाणार आहे. ६ नगरसेवकांची मराठीतून, ३ जणांची कोकणीतून तर ३ जणांची इंग्रजीतून शपथ घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Excise Policy Case: केजरीवाल विरुद्ध आमच्याकडे पुरावे, राजकारणाशी आमचा संबंध नाही; ED

Goa Today's Live News: गोव्यात 11 ते 14 मे दरम्यान तुरळक पावसाची शक्यता

Externment Orders: पास्टर डॉम्निक डिसोझा आणि जुआन मास्करारेन्हसला दिलासा; तडीपारीचा आदेश रद्द

Catholic Wedding: कॅथलिक समाजासाठी विवाहाची वेळ रात्री 12 पर्यंत वाढवावी; चर्चिल आलेमाव यांची मागणी

Goa Rain Update: गोव्यात 11 ते 14 मे दरम्यान तुरळक पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT