Sanquelim-Ponda Municipal Council:नगरसेवकांची मिळाली संमती; रश्मी देसाईच ठरल्या कारभारी

निवड बिनविरोध : आजच्या सोहळ्यात केवळ औपचारिक घोषणा बाकी
Rasmi Desai
Rasmi Desai Gomantak Digital Team

साखळी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे रश्मी देसाई यांची तर उपनगराध्यक्षपदी आनंद काणेकर यांची निवड निश्चित झालेली आहे. या दोन्ही पदांसाठी वरील दोन्हीही नगरसेवकांनी आपले उमेदवारी अर्ज पालिका मुख्याधिकारी कबीर शिरगावकर यांच्याकडे सुपुर्द केले.

या पदांसाठी अन्य एकही अर्ज न आल्याने या दोन्ही नगरसेवकांची या पदांसाठी निवड बिनविरोध निश्चित झाली आहे. आजच्या शपथग्रहण व निवडणूक प्रक्रियेत केवळ औपचारिक घोषणा होणार आहे. गेले अनेक दिवस उत्सुकता लागून राहिलेल्या याविषयावर व होणाऱ्या उलटसुलट चर्चांवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अखेर पडदा पाडला.

Rasmi Desai
Plastic Rice In Goa : बाणावलीत रेशनवर प्लास्टिक तांदूळ? आमदार व्हिएगस यांचा धक्कादायक दावा

सकाळी रवींद्र भवन येथे सर्व 11 ही नगरसेवकांबरोबर बैठक घेऊन त्यांनी नगराध्यक्षपदासाठी रश्मी देसाई यांचे तर उपनगराध्यक्षपदासाठी आनंद काणेकर यांचे नाव जाहीर केले. या दोन्ही नावांना उपस्थित इतर सर्व नगरसेवकांनी संमती देत त्यांचे अभिनंदनही केले.

Rasmi Desai
National Dengue Day 2023: डेंग्यूचे लक्षण अन् घरगुती उपाय, वाचा एका क्लिकवर

मुख्यमंत्र्यांनी रश्मी देसाई व आनंद काणेकर यांची नावे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदासाठी जाहीर केल्यानंतर या दोघांनीही थेट नगरपालिका कार्यालय गाठून आपले उमेदवारी अर्ज मुख्याधिकारी कबीर शिरगावकर यांच्याकडे सुपुर्द केले.

या दोन्ही पदांसाठी अन्य एकही अर्ज न आल्याने या दोघांचीही बिनविरोध निवड ग्राह्य ठरली आहे. आज होणाऱ्या शपथग्रहण व निवडणूक प्रक्रिया सोहळ्यात या दोघांचीही नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदी औपचारिक निवडीची घोषणा केली जाणार आहे.

Rasmi Desai
Vivek Agnihotri on AI : विवेक अग्निहोत्री म्हणतात "कॉपीरायटर आणि डिझाईनरची जागा आर्टिफिशिअल इंटिलिजन्स घेऊ शकत नाही"..

कोणत्याही भेदभावाशिवाय कार्य करणार

साखळी नगरपालिकेत गेल्या दहा वर्षांत आपण केलेल्या निस्वार्थ कामाला भाजपने व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी न्याय दिला आहे. याच पद्धतीने नगराध्यक्षपदाची जबाबदारी पेलताना कामांमध्ये कोणत्याही प्रकारचे राजकीय व पक्षीय भेदभाव करणार नाही, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्षपदासाठी निवड झालेल्या रश्मी देसाई यांनी व्यक्त केली.

Rasmi Desai
Plastic Rice In Goa : बाणावलीत रेशनवर प्लास्टिक तांदूळ? आमदार व्हिएगस यांचा धक्कादायक दावा

5 वर्षांत 6 महिला नगराध्‍यक्ष : साखळी पालिकेत 12 पैकी 11 प्रभागांमध्ये भाजपने विजय मिळविला. या 11 मध्ये 6 महिला व 5 पुरुष नगरसेवक आहेत. नगराध्यक्षपद महिलांसाठी खुले आहे. सर्वप्रथम रश्मी देसाई यांची यासाठी निवड झाली आहे. उर्वरित 5 महिलांना हे पद वाटून दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे उपनगराध्यक्षपदही पाच पुरुष नगरसेवकांमध्ये 5 वर्षांसाठी वाटून दिले जाणार आहे.

Rasmi Desai
CM Pramod Sawant : मॉन्सूनसाठी आपत्कालीन व्यवस्थापन पूर्णपणे सज्ज : मुख्यमंत्री

5 वर्षांत 6 महिला नगराध्‍यक्ष : साखळी पालिकेत 12 पैकी 11 प्रभागांमध्ये भाजपने विजय मिळविला. या 11 मध्ये 6 महिला व 5 पुरुष नगरसेवक आहेत. नगराध्यक्षपद महिलांसाठी खुले आहे. सर्वप्रथम रश्मी देसाई यांची यासाठी निवड झाली आहे. उर्वरित 5 महिलांना हे पद वाटून दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे उपनगराध्यक्षपदही पाच पुरुष नगरसेवकांमध्ये 5 वर्षांसाठी वाटून दिले जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com