Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

Goa Bahrain Cricket Agreement: गोवा क्रिकेट असोसिएशन (जीसीए) आणि बहरीन क्रिकेट महासंघ यांच्यात क्रिकेट विकासासंदर्भात सामंजस्य करार भविष्यात प्रत्यक्षात येऊ शकतो.
Goa Bahrain Cricket Agreement
Goa CricketDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा क्रिकेट असोसिएशन (जीसीए) आणि बहरीन क्रिकेट महासंघ यांच्यात क्रिकेट विकासासंदर्भात सामंजस्य करार भविष्यात प्रत्यक्षात येऊ शकतो. यासंदर्भात उभयपक्षी झालेली चर्चा सकारात्मक ठरली.

आखातातील नावाजलेले उद्योजक, तसेच आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रशासक असलेले महंमद मन्सूर सध्या गोवा भेटीवर आहेत. त्यांनी पर्वरी येथील जीसीए मुख्यालयात जीसीए अध्यक्ष महेश देसाई, खजिनदार अब्दुल माजिद, माजी अध्यक्ष चेतन देसाई यांच्याशी संभाव्य सामंजस्य करारासंदर्भात सविस्तर चर्चा केली. यात क्रिकेटविषयक कौशल्य, तांत्रिक ज्ञान, प्रशिक्षक आणि विकास कार्यक्रमांची देवाणघेवाण तसेच दौरे आणि सामन्यांद्वारे संघांना आंतरराष्ट्रीय अनुभव मिळवून देण्याच्या संधींचा समावेश आहे.

Goa Bahrain Cricket Agreement
Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

मन्सूर हे विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या ‘सारा समूहा’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहेत. ते बहरीन क्रिकेट महासंघाच्या सल्लागार मंडळाचे अध्यक्ष, तसेच आशियाई क्रिकेट परिषदेच्या (एसीसी) कार्यकारी मंडळाचे सदस्य आहेत.

राज्य क्रिकेट संघ दौऱ्यावर जाणार?

गोवा क्रिकेट संघाने अलीकडेच ओमानचा दौरा केला होता, त्या पार्श्वभूमीवर राज्य क्रिकेट संघ बहरीनचा दौरा करू शकतो. मन्सूर यांनी गोवा क्रिकेट संघाला बहरीन भेटीचे निमंत्रणही दिले. त्यामुळे भविष्यात दोन्ही देशांतील संघांमध्ये सामने आणि क्रिकेटविषयक देवाणघेवाण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बहरीन क्रिकेट महासंघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) व आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) यांचे अधिकृत सहयोगी सदस्य असून संघ आयसीसी व एसीसी अधिकृत स्पर्धांत भाग घेतो. त्यांना टी-२० आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त आहे.

Goa Bahrain Cricket Agreement
Goa Forward AAP Alliance: 'गोवा फर्स्ट' आघाडीची तयारी अंतिम टप्प्यात! विजय सरदेसाईंना सर्वाधिकार; 'आप'सह समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा निर्णय

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com