Sanquelim-Ponda Municipal Council : साखळी नगराध्‍यक्षपदी रश्मी देसाई बिनविरोध; उपनगराध्यक्ष आनंद काणेकर

फोंड्यात रितेश नाईक आणि दीपा कोलवेकर यांचे पारडे जड
Rashmi Desai And Anand Kanekar
Rashmi Desai And Anand KanekarDainik Gomantak

साखळी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे रश्मी देसाई यांची तर उपनगराध्यक्षपदी आनंद काणेकर यांची बिनविरोध निवड झाली. या पालिकेत भाजपचे निर्विवाद वर्चस्व आहे.

तर, फोंडा पालिकेत सत्ताधारी गटाकडून नगराध्यक्षपदासाठी रितेश नाईक आणि उपनगराध्यक्षपदासाठी दीपा कोलवेकर यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. सध्या त्यांच्या गटाकडे बहुमत असल्याने त्यांची निवड निश्चित मानली जात आहेत. ही निवड उद्या मंगळवारी होणार आहे.

साखळी पालिकेत धर्मेश सगलानी यांचा पराभव करून ‘जायंट किलर’ ठरलेल्या रश्मी देसाई यांची नगराध्‍यक्षपदी वर्णी लागल्याचे आज स्पष्ट झाले. महिलांसाठी राखीव असलेल्या या पदासाठी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी देसाई यांचा एकमेव अर्ज आला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. तर उपनगराध्यक्षपदासाठी आनंद काणेकर यांचा एकमेव अर्ज झाल्याने तेही बिनविरोध निवडून आले.

Rashmi Desai And Anand Kanekar
Goa Congress : कर्नाटकला दिलेल्या डीपीआरचे श्रेय मुख्यमंत्र्यांनी का टाळले?

7 मे रोजी झालेल्या निवडणुकीत भाजपपुरस्कृत पॅनलला 12 पैकी 11 जागा मिळाल्या होत्या. तर एका जागेवर विरोधी पॅनलला आपला उमेदवार बिनविरोध निवडून आणता आला होता.

प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत मात्र विरोधकांचा धुवा उडाला होता. त्यामुळे या पालिकेत विरोधकांचे अस्तित्व नसल्यात जमा होते. यामुळेच सत्ताधारी गटाकडून निश्चित झालेले उमेदवारच बिनविरोध होणार होते हे अगोदरच स्पष्ट झाले होते.

5 वर्षांत 6 महिला घेणार नगराध्‍यक्षपद वाटून

साखळी पालिकेत 12 पैकी 11 प्रभागांमध्ये भाजपने विजय मिळविला. या 11 मध्ये 6 महिला व 5 पुरुष नगरसेवक आहेत. नगराध्यक्षपद महिलांसाठी खुले आहे. सर्वप्रथम रश्मी देसाई यांची त्‍या पदासाठी निवड झाली आहे.

उर्वरित 5 महिलांना हे पद वाटून दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे उपनगराध्यक्षपदही पाच पुरुष नगरसेवकांमध्ये 5 वर्षांसाठी वाटून दिले जाणार आहे. सर्व अकराही नगरसेवकांना या पालिका मंडळात समान संधी देण्याचे नियोजन भाजपतर्फे करण्यात आल्याची माहिती प्राप्‍त झाली आहे.

Rashmi Desai And Anand Kanekar
CM Pramod Sawant : पावसाळ्यातील कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सरकार सज्ज : मुख्यमंत्री डॉ. सावंत

फोंडा नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदासाठी उद्या निवडणूक

फोंडा नगरपालिकेमध्ये भाजपपुरस्कृत पॅनलकडून नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष रितेश नाईक तर उपनगराध्यक्षपदासाठी दीपा कोलवेकर यांनी आपापला उमेदवारी अर्ज भरला आहे. तर, ‘रायझिंग फोंडा’ पॅनलतर्फे अनुक्रमे शिवानंद सावंत आणि वेदिका वळवईकर यांनी अर्ज दाखल केलेले आहेत.

त्‍यामुळे तेथे उद्या मंगळवारी निवडणूक होणार आहे. सध्या सत्ताधारी भाजपपुरस्कृत पॅनलकडे बहुमत आहे. 15 पैकी 10 जागा त्यांनी जिंकल्या आहेत. तर, ‘रायझिंग फोंडा’ गटाकडे 4 आणि 1 अपक्ष असे 5 नगरसेवक आहेत. त्यामुळे बहुमताच्या आधारे सत्ताधारी गट बाजी मारणार हे स्पष्ट झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com