mla Subhash Phaldesai  Gomantak Digital Team
गोवा

Sanquelim News : साखळी किल्ला नूतनीकरण काम डिसेंबरपर्यंत मार्गी - सुभाष फळदेसाई

मंत्री सुभाष फळदेसाई : राज्‍यातील वारसास्थळांच्या संवर्धनासाठी पुरातत्त्व खाते सदोदित कार्यरत

गोमन्तक डिजिटल टीम

साखळी : पुरातत्व खात्याने टप्प्याटप्प्याने ऐतिहासिक वास्तूंच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले आहे. आपल्या राज्याची संस्कृती व खरा इतिहास देशासमोर मांडताना राज्यातील सर्व वारसास्थळांच्या संवर्धनासाठी खाते काम करीत आहे.

सर्व वारसास्थळांना पुनर्जीवित करून तेथे पर्यटनाला बहर आणण्याचा उद्देश आहे. त्‍याच उद्देशाने साखळीतील किल्‍ल्‍याचे काम हाती घेण्‍यात आले असून ते डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्‍यात येईल, अशी माहिती पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी साखळी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

साखळी बाजारात असलेल्या ऐतिहासिक अशा किल्‍ल्याचे नूतनीकरण सध्या पुरातत्व खात्यातर्फे सुरू आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी मंत्री फळदेसाई यांनी साखळीला भेट दिली. यावेळी साखळीचे उपनगराध्यक्ष आनंद काणेकर, पुरातत्व खात्याचे संचालक डॉ. नीलेश फळदेसाई, उपसंचालक दत्तराज देसाई, उपअधीक्षक वरद सबनीस, साहाय्‍यक सुमेश महाले, साखळी भाजप मंडळ अध्यक्ष गोपाळ सुर्लकर, विठोबा घाडी, संतोष मळीक, पांडुरंग कुट्टीकर, धनंजय वाळके व इतरांची उपस्थिती होती.

साखळीतील या किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व असून त्याचे नूतनीकरण व्हावे तसेच या किल्ल्याच्या जागेचा ज्‍येष्ठ नागरिक, लहान मुले व इतरांसाठी योग्य वापर व्हावा या उद्देशाने नूतनीकरणाचे काम सुरू आहे.

वारसास्थळे राज्याची संपत्ती

इतिहास व वारसास्थळे राज्याची खरी संपत्ती आहे. म्‍हणून या स्थळांचा पर्यटनदृष्ट्या विकास केला जात आहे. ती लोकांच्या नजरेत यावीत व राज्यातील पर्यटनाचा एक महत्त्वाचा भाग व्हावा यासाठी पुरातत्त्व खाते व पर्यटन खाते यांची सांगड घालण्यात येईल, जेणेकरून गोव्याचा इतिहास, संस्कृती व वारसास्थळांची माहिती देशातील व जगभरातील लोकांना मिळू शकेल.

- सुभाष फळदेसाई,

पुराभिलेख आणि पुरातत्‍व खात्‍याचे मंत्री

साखळी बाजारातील मुख्य ठिकाणी असलेला हा किल्ला म्हणजे साखळीचे वैभव आहे. त्याचे नूतनीकरण व पर्यटनदृष्ट्या सुशोभीकरण ही प्रत्येक साखळीवासीयासाठी अभिमानास्पद बाब होय. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पुढाकाराने व प्रयत्नांनी या किल्ल्याला नवीन साज चढत आहे. या कामामुळे साखळीच्या विकासात अधिक भर पडणार आहे.

- आनंद काणेकर, उपनगराध्यक्ष, साखळी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT