Sanquelim News : साखळीत मॉन्सूनपूर्व कामांसाठी आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना

नगराध्यक्ष ॲक्शन मोडवर : दुर्लक्षित कामांमुळे लोकांना त्रास नको
Sankhlim Municipality Election 2023
Sankhlim Municipality Election 2023Dainik Gomantak

Sanquelim : साखळी नगरपालिकेचा पदभार स्वीकारल्यानंतर भाजप पालिका मंडळ नगराध्यक्ष रश्मी देसाई यांच्या नेतृत्वाखाली ॲक्शन मोडवर आले आहे. शुक्रवार, 26 मे रोजी नगराध्यक्ष रश्मी देसाई यांनी मॉन्सूनपूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी सर्व नगरसेवकांसह सर्व संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली.

या बैठकीत सर्व अधिकाऱ्यांना पावसाळ्यात आपापल्या जबाबदाऱ्या कर्तव्यदक्षपणे पार पाडण्याची सूचना करण्यात आली. तसेच कोणत्याही सरकारी खात्याच्या दुर्लक्षितपणामुळे सामान्य लोकांना पावसाळ्यात त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी, असेही निर्देश देण्यात आले.

Sankhlim Municipality Election 2023
Beach Wedding In Goa : किनाऱ्यावरील विवाह सोहळे, कार्यक्रम महागले; अधिसूचना जारी

या बैठकीस नगरपालिका मुख्याधिकारी कबीर शिरगावकर, उपनगराध्यक्ष आनंद काणेकर, नगरसेवक यशवंत माडकर, निकिता नाईक, सिद्धी प्रभू, प्रवीण ब्लेगन, दयानंद बोर्येकर, दीपा जल्मी, अंजना कामत तसेच जलस्रोत खाते, अग्निशामक दल, वीज खाते, पाणीपुरवठा खाते, आरोग्याधिकारी, मलनिस्सारण विभाग, पोलिस व इतर अधिकारी व अभियंते उपस्थित होते.

नगरपालिकेतर्फे गटरांची साफसफाई तर जलस्रोत खात्यातर्फे विविध भागातील नाल्यांची साफसफाई हाती घेण्यात आलेली आहे. पाणीपुरवठा विभागाला काही ठिकाणी फुटलेल्या व नादुरुस्त जलवाहिन्या दुरुस्त करण्याची सूचना करण्यात आली आहे. धोकादायक झाडांची काटछाट करण्याचे आदेश अग्निशामक दलाला दिले आहेत.

Sankhlim Municipality Election 2023
Margaon Municipality : मडगाव पालिका कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांत वाढ

सांडपाणी सोडणाऱ्यांवर कारवाई

घरातील सांडपाणी थेट गटरांमध्ये सोडल्यामुळे रोगराई पसरण्याची भीती असते. सांडपाणी गटरांत सोडणे बेकायदेशीर आहे. अशा प्रकारांची पाहणी करून सर्व्हे अहवाल करण्याची सूचना बाजार निरीक्षकांना देण्यात आलेली आहे. हा अहवाल येताच त्या सर्वांवर कारवाई केली जाणार आहे. त्यापूर्वी सर्वांनी स्वतःहून हे प्रकार थांबवावेत, असा इशारा नगराध्यक्ष रश्मी देसाई यांनी दिला.

पावसाळ्यातील साथीच्या रोगांवर तसेच मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांबाबत लोकांमध्ये आतापासूनच जागृती करण्यात यावी, अशी सूचना आरोग्य अधिकाऱ्यांना करण्यात आली. पावसाळ्यात साखळी परिसरात होणारी झाडांची पडझड व इतर घटनांच्या समयी आवश्यक असलेले अतिरिक्त मनुष्यबळ नगरपालिका अग्निशामक दलाला उपलब्ध करून देणार आहे.

रश्मी देसाई, नगराध्यक्ष, साखळी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com