Sanquelim Market
Sanquelim Market Dainik Gomantak
गोवा

Sanquelim Market : साखळी बाजारपेठेत पूर्वीच्या जागेत बसलेल्या विक्रेत्यांना हुसकावले

गोमन्तक डिजिटल टीम

साखळीचा आठवडी बाजार नवीन जागेत स्थलांतर केला असतानाही सोमवारी काही भाजी विक्रेत्यांनी पुन्हा पूर्वीच्याच जागेत धंदा करण्याचा प्रयत्न केला. मात्र पालिकेने वेळीच कारवाई करून या विक्रेत्यांना तेथून हुसकावून लावले.

गेल्या सोमवारपासून (ता.2) साखळीचा आठवडी बाजार नवीन जागेत स्थलांतर करण्यात आला आहे. आठवडी बाजारात व्यवसाय करणाऱ्या बहुतेक सर्व विक्रेत्यांना नवीन जागेत जागाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. नगराध्यक्ष राजेश सावळ आणि पालिकेचे अधिकारी बाजारातील स्थितीवर लक्ष ठेवून होते.

स्थलांतर केल्यानंतर नवीन जागेत दुसऱ्यांदा बाजार भरला होता. नवीन जागेत बहुतेक विक्रेत्यांनी आपला धंदाही सुरू केला होता. मात्र काही भाजी विक्रेत्यांनी सकाळी पूर्वीच्या आणि आता पार्किंगसाठी आरक्षित केलेल्या जागेत बसून धंदा सुरू केला. हा प्रकार साखळीचे नगराध्यक्ष राजेश सावळ यांच्या लक्षात येताच, त्यांनी त्वरित या विक्रेत्यांना तेथून हटविण्याचे निर्देश मार्केट अधिकाऱ्यांना देताच, या विक्रेत्यांना पूर्वीच्या जागेवरून हटविण्यात आले. बाजार नवीन जागेत स्थलांतर केल्यानंतर बाजारातील स्थिती नियंत्रणात येत आहे.

स्थलांतर केल्यामुळे बाजाराची पूर्वीची जागा पार्किंगसाठी आरक्षित करण्यात आली आहे. चारचाकी आणि दुचाकी पार्किंग करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. बाजारातील पार्किंग समस्या बऱ्याच अंशी नियंत्रणात आली आहे. नवीन ठिकाणी जागा देताना जुन्या आणि पारंपरिक विक्रेत्यांना प्राधान्य देण्यात आले आहे, अशी माहिती साखळीचे नगराध्यक्ष राजेश सावळ यांनी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: पर्रीकरांनी विश्वास घातकी म्हटले त्याच गॉडमनला भाजपात प्रवेश; मोदी परिवारात देशद्रोही लोक - पाटकर

Goa Abduction Case: राजस्थानच्या व्यक्तीचे माडेल, थिवीतून अपहरण; जीवे मारण्याची धमकी देत लुटमार

Goa Today's Live News: 30 लाख सरकारी नोकऱ्या आणि 5 हजार कोटी स्टार्ट-अप फंड, काँग्रेसची वचनबद्धता - एल्टन डिकोस्ता

मलेशियाच्या आर्थिक स्थितीचा हवाला देत KFC ने बंद केली आउटलेट्स

Goa Crime News: पर्वरीत आयपीएलवर बेटिंग, गुजरात, युपीच्या 16 जणांना अटक; 15 लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT